एक्स्प्लोर
Advertisement
'हिंदुत्वाची परिभाषा एकच, ती म्हणजे सनातन'; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं उद्धव ठाकरेंना उत्तर
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात आरोपी साध्वी प्रज्ञा यांनी आज हजेरी लावली.
Malegaon balst case 2008, Sadhvi Pragya : हिंदुत्वाची परिभाषा एकच आहे. तुझं हिंदुत्व आणि माझं हिंदुत्व असा त्यात फरक करताच येणार नाही. कारण हिंदुत्व हे एकच आहे आणि ते सनातन आहे, असं उत्तर भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दिलं आहे. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) पार पडलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केले. त्यांनी केलेल्या टिकेबद्दल विचारलं असता साध्वी प्रज्ञासिंह यांनी हे उत्तर दिलं आहे.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची विशेष एनआयए न्यायालयात हजेरी
मालेगाव बॉम्बस्फोट 2008 च्या खटल्यातील सुनावणीस गुरुवारी या प्रकरणातील आरोपी आणि विद्यमान भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी विशेष एनआयए न्यायालयात हजेरी लावली. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या काही कारणानिमित्त मुंबईत असल्यानं त्यांनी आवर्जून मुंबई सत्र न्यायालयात हजेरी लावली होती. वास्तविक प्रत्येक आरोपीनं या खटल्यास नियमित हजेरी लावणं अनिवार्य आहे. मात्र काही मोजकेच आरोपी या खटल्यास आपली हजेरी लावतात.
एटीएस अधिकाऱ्याची एनआयए कोर्टात उलटतपासणी
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तत्कालीन एटीएस अधिकाऱ्याची एनआयए कोर्टात उलटतपासणी घेण्यात आली. आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याशी संबंधित या साक्षीदाराची उलटतपासणी होती. या अधिकाऱ्यायाला कोर्टात हजर राहण्यासाठी वॉरंट बजावण्यात आल्यानंतर तो कोर्टापुढे हजर झाला. हजर होताच 5 हजारांचा जामीन भरून या एटीएस अधिकाऱ्यानं कोर्टानं काढलेला वॉरंट रद्द करून घेतला. या संबंधित साक्षीदारानं त्यावेळी साध्वी प्रज्ञा आणि अन्य काही जणांना याप्रकरणी अटक केली होती. ठाकूर यांच्या वकिलांनी या साक्षीदाराची उलटतपासणी घेतली. शुक्रवारीदेखील ही उलटतपासणी सुरू राहणार आहे.

एटीएस अधिकाऱ्याची साक्ष हिंदीमध्ये घेण्याची विनंती
आजच्या सुनावणी दरम्यान आपल्याला मराठी येत नाही, म्हणून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्या वकिलामार्फत न्यायालयाकडे तक्रार करत एटीएस अधिकाऱ्याची साक्ष हिंदीमध्ये घेण्याची विनंती केली. कोर्टानं ही विनंती मान्य करत वकिलांना हिंदीमध्ये प्रश्न विचारण्यास अनुमती दिली. यावर एटीएस अधिका-याच्या वकिलांनी आक्षेप घेतल्यानं काहीकाळ दोन्ही वकीलांत खडाजंगी झाली. मात्र न्यायालयानं हस्तक्षेप केल्यानंतर दोघेही शांत झाले आणि सुनावणी पुन्हा सुरू झाली.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नागपूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement