एक्स्प्लोर
अवघ्या 1300 रुपयांसाठी मित्राची हत्या, काही तासातच आरोपीला बेड्या
![अवघ्या 1300 रुपयांसाठी मित्राची हत्या, काही तासातच आरोपीला बेड्या Ulhasnagar Murder For Only 1300 Rs Latest Update अवघ्या 1300 रुपयांसाठी मित्राची हत्या, काही तासातच आरोपीला बेड्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/27080042/Ulhasnagar-Murder.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
उल्हासनगर: अवघ्या तेराशे रुपयांसाठी मित्रानंच मित्राची हत्या केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. सलीम शेख असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. सलीमच्या हत्येनंतर केवळ काही तासांतच आरोपी संतोष वाघमारेला अटक कऱण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी सलीमनं संतोषकडून काही पैसे उधार घेतले. त्यापैकी 1300 रुपये परत करणं बाकी होतं. त्यावरुन दोघांत वाद झाला. त्यावेळी संतोषनं थेट सलीमवर जीवघेणा हल्ला केला. संतोषनं सलीमच्या छातीत चाकू खुपसला आणि तिथून पळ काढला.
सलीमला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अवघ्या काहीच तासांत पोलिसांनी संतोषला शोधून काढत बेड्या ठोकल्यात. याप्रकरणी पोलिसांनी सलीमवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
बीड
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)