एक्स्प्लोर

महापौरांचा मराठीद्वेष्टेपणा मस्करीतून!, कलानींची सारवासारव

कलानी यांनी सारवासारव करत आपण जे काही बोललो ते मस्करीत बोललो असल्याचा दावा केला आहे. मात्र राज्यभरातून टीकेची झोड उठल्यावर कलानी यांनी केलेला हा दावा कितपत खरा मानायचा असा सवाल नागरिक करत आहेत.

उल्हासनगर :  उल्हासनगरच्या महापौर पंचम कलानी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आपण केलेलं 'ते' वक्तव्य मस्करीत केलं होतं, असे महापौर कलानी यांनी म्हटले आहे. उल्हासनगर महापालिकेची महासभा सुरू असताना 'मला मराठी येत नाही, सिंधीत बोला' असं वक्तव्य महापौर पंचम कलानी यांनी केलं होतं. या प्रकारानंतर शहरात मोठी नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे आता कलानी यांनी सारवासारव करत आपण जे काही बोललो ते मस्करीत बोललो असल्याचा दावा केला आहे. मात्र राज्यभरातून टीकेची झोड उठल्यावर कलानी यांनी केलेला हा दावा कितपत खरा मानायचा असा सवाल नागरिक करत आहेत. 'मला मराठी येत नाही, सिंधीत बोला!' महापौरांचा महासभेत मराठीद्वेष उल्हासनगरच्या महापौर पंचम कलानी  त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. भर महापालिकेच्या महासभेत त्यांनी दाखवलेल्या मराठीद्वेष्टेपणामुळे शहरासह राज्यात नाराजी पसरली आहे. उल्हासनगर महापालिकेची महासभा मागील आठवड्यात पार पडली. या महासभेत शहरातल्या पाणीप्रश्नावरून रणकंदन सुरू होतं. त्यातच शिवसेनेचे नगरसेवक विजय पाटील यांनी मराठीत प्रश्न मांडायला सुरुवात केली. त्यावर महापौर पंचम कलानी यांनी त्यांना थांबवत आपल्याला मराठी येत नसून सिंधीत बोला, असं वक्तव्य केलं. त्यावर पाटील यांनी तुम्हाला आम्ही सिंधीतही सांगितलं तरी कळत नाही असं प्रत्युत्तर दिलं. मात्र महापौरांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ शहरात व्हायरल झाल्यानंतर शहरात चांगलीच नाराजी पसरली. याबाबत मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला असून मराठी येत नसेल, तर महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका घेतली. महापौरांना मराठी शिकण्यासाठी बाराखडीचं पुस्तक आणि पाटी पेन्सिल भेट देणार असल्याचं मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, पंचम कलानी या माजी आमदार पप्पू कलानी आणि विद्यमान आमदार ज्योती कलानी यांच्या सूनबाई आहेत. शहरात इतकी वर्ष वास्तव्य करून आणि शहरावर इतकी वर्ष सत्ता गाजवूनही त्यांना साधं मराठी येत नसल्याबाबत सध्या नाराजी व्यक्त होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde: सरकारने दमानियांना विचारुन खरेदीच्या किंमती ठरवायच्या?आरोपांवरुन संतापले, म्हणाले..Anjali Damania: डीबीटीच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर,  दुप्पट दराने  खरेदी,  मुंडेंवर गंभीर आरोपIndrajeet Sawant : महाराज आग्र्याहून सुटताना Rahul Solapurkar तिथे होता का? : इंद्रजीत सावंतABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 04 February 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊद्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला
लाडक्या बहीण योजनेतील 'त्या' बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप नको, छगन भुजबळांचा सरकारला सल्ला
Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
वर्षा बंगल्यावर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं का पुरली? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
Embed widget