एक्स्प्लोर
Advertisement
मेहंदी सुकण्याआधी भावाने बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं
उल्हासनगर : घराण्याची बदनामी झाल्याच्या समजुतीतून उल्हासनगरमध्ये भावानेच बहिणीच्या पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या आठवड्याभरातच तरुणाने आपल्या बहिणीचा संसार मोडला.
सहा दिवसापूर्वीचं पंकज गौहेर आणि पूजा सौदे यांचं सर्वांच्या संमतीनं कोर्टात लग्न झालं होतं. पूजाच्या घरची आर्थिक परिस्थिती ही पंकजच्या आर्थिक स्थितीपेक्षा चांगली होती. तसेच पंकज हा सरकारी नोकरीत नसल्याने पूजाच्या घरच्या लोकांना त्याचा राग होता. या लग्नामुळे समाजात
आपली बदनामी झाल्याची खदखद पूजाच्या नातेवाईकांच्या मनात होती.
याच रागातून सोमवारी पूजाचा भाऊ अरुण आणि त्याचे साथीदार पंकजच्या घरी घुसले. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. पंकजला वाचवण्यासाठी पूजासह नातेवाईकांनी प्रयत्न केला, पण त्यांनाही मारहाण झाली. पंकजला तातडीनं रुग्णालयात नेलं पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे, तर पूजानं आपल्या भावाला फाशी व्हावी अशी मागणी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement