एक्स्प्लोर

अहवालावर विश्वास नाही, मग दिल्लीत गाढवं बसलीयेत का? : उद्धव ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुलुंडमधील सभेनंतर कांदिवलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी काही क्षणात प्रत्युत्तर दिलं. “केंद्राच्या अहवालावर विश्वास नसेल, तर केंद्रात तुमची गाढवं बसवली आहेत का?”, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शीवरील टीकेला उत्तर दिले. केंद्राने अहवालात मुंबईबद्दल स्पष्ट उल्लेख केला आहे. अहवाल केंद्राचा आहे, मग मुख्यमंत्री कशाला खोटं बोलत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. शिवाय, केंद्राच्या अहवालावरच विश्वास नसेल, तर केंद्रात तुमची गाढवं बसली आहेत का, असा सवालही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला. मुंबईचा पाटना केला आहे, असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना अपमान केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय, मुंबईचं आम्ही पाटना केला असेल, तर तुम्ही दोन वर्षे तंबाखू चोळत बसला होतात का?, असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
  • भाजपने 'पारदर्शक' राम मंदिर बांधलंय, कुणालाच दिसत नाही - उद्धव ठाकरे
  • शिवसेनेवर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा घसाच बसला होता, आता घसा जरा उठलाय - उद्धव ठाकरे
  • फडणवीस हे 'उपरवाल्याच्या मर्जी'वाले - उद्धव ठाकरे
  • पारदर्शक कारभारात 'मुंबई नंबर - 1' - उद्धव ठाकरे
  • केंद्राच्या अहवालावर विश्वास नसेल, तर केंद्रात तुमची गाढवं बसलीयेत का? - उद्धव ठाकरे
  • अहवाल केंद्राचा आहे, मुख्यमंत्री तुम्ही कशाला खोटं बोलत आहात? - उद्धव ठाकरे
  • पातळी नसलेल्या माणसाशी आमची लढत असल्याची लाज वाटायला लागली आहे - उद्धव ठाकरे
  • मुंबईचं आम्ही पाटना केला असेल, तर तुम्ही दोन वर्षे तंबाखू चोळत बसला होतात का? - उद्धव ठाकरे
  • पाटना शहराशी मुंबईची तुलना म्हणजे मुंबईकरांचा अपमान - उद्धव ठाकरे
  • मोदी रोज नव्या देशात असतात, म्हणून त्यांना वाटतं 'देश बदल रहा है' - उद्धव ठाकरे
  • केंद्राच्या अहवालातील यादीत फडणवीसांचं नागपूर कुठेही दिसत नाही - उद्धव ठाकरे
  • कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले - उद्धव ठाकरे
  • कल्याण-डोंबिवलीला मुख्यमंत्री साडेसहा हजार कोटी रुपये देणार होते, अजून एक पैसाही दिला नाही - उद्धव ठाकरे
  • आमचं एकतरी काम खोडून दाखवा, हे माझं मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना आव्हान - उद्धव ठाकरे
  • मुंबईत कामं करत असताना भाजप गप्प बसली, हीच मोठी मदत - उद्धव ठाकरे
  • मुंबईबद्दल बोलताना नागपूरबद्दल का बोलत नाहीत? - उद्धव ठाकरे
  • मुंबईत शाळा आणि हॉस्पिटल महापालिकेने बांधली, सरकारने नाही - उद्धव ठाकरे
  • सफाई कामगारांना हक्काचं घर देणार - उद्धव ठाकरे
  • मेट्रोचा शोध भाजपने नाही लावला, मेट्रो काँग्रेसने आणलीय - उद्धव ठाकरे
  • यांच्या स्टेजवर पप्पू कलानी, एन डी तिवारी, हे यांचं परिवर्तन, असं परिवर्तन तुमचं तुम्हाला लख लाभो, मुंबईकरांना नको - उद्धव ठाकरे
  • यांना लाज, लज्जा, शरम नाही, असं मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत दुर्दैवाने बोलायला लागतंय. कारण यांच्या बापाने दिलेला अहवाल यांना दिसत नाही. ढळढळीत सत्य दिसत नाही - उद्धव ठाकरे
  • मला तुमच्या खोटेपणाचा, ढोंगीपणाचा आणि नादानपणाचा विट आला म्हणून मी युती तोडली, होय मी युती तोडली - उद्धव ठाकरे
  • एकनाथ खडसेंना बळीचा बकरा बनवून पुढे केलं आणि युती तोडायला सांगितलं, नंतर त्यांनाच कापलं, अशी ही खोटी माणसं - उद्धव ठाकरे
  • नको तो घास घ्यायला जाऊ नका, आम्ही मुंबई प्रेमाने, निष्ठेने जिंकली, जे तुमच्याकडे नाही - उद्धव ठाकरे
  • अमित शहांना सांगा, ही 'फ्रेंडली मॅच' नाही. पाठीवर वार नाही, आम्ही छताडावर वार करतो - उद्धव ठाकरे
  • मोदी ज्या दिवशी सभेला येतील, त्यावेळेस शिवसेना खासदार त्या व्यासपीठावर जाऊन मोदींना शिवसेनेच्या विजयाच्या जल्लोषाचं आमंत्रण देतील - उद्धव ठाकरे
  • मोदींची विश्वासार्हता संपल्याने स्टॅम्प पेपरवर घोषणा – उद्धव ठाकरे
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget