एक्स्प्लोर
मुख्यमंत्रीसाहेब, साम-दाम-दंड-भेदचा अर्थ समजावून सांगा : उद्धव ठाकरे
“आम्ही जरी ऑडिओ क्लिप तोडून मोडून दाखवली असेल, तरी मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केलं आहे की, तो आवाज त्यांचा आहे. त्या प्रकरणातला जो महत्वाचा गाभा आहे, तो आम्ही समोर आणला. पूर्ण भाषण समोर आणायची गरज नव्हती.”
मुंबई : कूटनिती, साम-दाम-दंड-भेद याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी आम्हाला समजावून सांगावा. आम्ही त्यांच्याकडून मराठी शिकायला तयार आहोत, असा टोमणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन लगावला आहे. ऑडिओ क्लिपच्या वादाबाबत त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिले.
“या ऑडिओ क्लिपबद्दल एकच सांगेन 'जो बुंद से गई है, वो हौद नहीं आती' यातच सगळ्या गोष्टी आल्यात. भाजपला जर याबाबत कारवाई करायची असेल तर करु द्या. आम्ही पण तक्रार केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल. या ऑडिओ क्लिपची तपासणी करा आणि जो गुन्हेगार असेल त्याच्या कारवाई होईल.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“कळत न कळत मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केलंय की, ऑडिओ क्लिपमधील वाक्य त्यांचीच आहेत. त्यांना जर वाटत असेल कोणत्याही प्रकारची छेडछाड केली आहे, तर त्यांनी त्यांच्याकडे कुणी कुशल एडिटर असेल तर भाजपने तो आणावा.”, असे आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिले.
“आम्ही जरी ऑडिओ क्लिप तोडून मोडून दाखवली असेल, तरी मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केलं आहे की, तो आवाज त्यांचा आहे. त्या प्रकरणातला जो महत्वाचा गाभा आहे, तो आम्ही समोर आणला. पूर्ण भाषण समोर आणायची गरज नव्हती.”, असेही ते म्हणाले.
तसेच, पैसे वाटतानाच्या गोष्टी सुद्धा आम्ही सगळ्यांसमोर आणल्या आहेत. आता त्याबाबत सुद्धा विचार करावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
काय आहे ही फडणवीसांची कथित ऑडिओ क्लिप?
एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता... आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे?
ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही
आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे
ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा...
साम, दाम, दंड, भेद...
ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही.
कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे.
'अरे ला कारे'च करायचं..
'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप सादर
जनाची नाही, मनाची तरी ठेव, मुख्यमंत्र्यांचं आदेश बांदेकरांवर टीकास्त्र
पालघर LIVE : पैसे वाटपप्रकरणी 12 जणांवर गुन्हा
'क्लिप खरी असेल तर फडणवीसांचा राजीनामा घ्या, खोटी असल्यास उद्धव ठाकरेंवर कारवाई करा'
पालघर पैसे वाटप: सेनेचे दिग्गज नेते रात्री 2 वा. डहाणू पोलिसात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement