एक्स्प्लोर
नाराज असतो तर आमच्या पद्धतीनं उत्तर दिलं असतं: उद्धव ठाकरे

मुंबई: राज्यमंत्रिमंडळ विस्तारावर आम्ही समाधानी आहोत. आमच्या सहमतीनंच मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आम्ही नाराज असतो तर आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर दिलं असतं. अशा शब्दात उद्धव ठाकरेंना नाराजीच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. आम्हाला मिळालेल्या राज्यमंत्री पदावर आम्ही खूश आहोत असं सांगायलाही ते विसरले नाहीत. मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरेंनी दांडी मारली. त्यामुळे शिवसेना नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी स्वत: पुढे येऊन त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. खरं तर राज्यात शिवसेनेला आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद हवं होतं. पण भाजपनं फक्त दोन राज्यमंत्रीपदावर त्यांची बोळवण केली आहे. शिवसेनेचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आणि जळगावचे आमदार गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र























