एक्स्प्लोर

ठाणे जिल्ह्यात दोन दुर्घटना; बदलापुरात वायु गळती तर भिवंडीत 15 गोदामं जळून खाक

ठाणे जिल्ह्यात गुरुवारी (3 जून) दोन दुर्घटना घटना घडल्या. बदलापूर एमआयडीसीमधील एका कंपनीतून वायु गळती झाल्याने एकच गोंधळा उडाला. तर भिवंडीत लागलेल्या आगाती भंगाराची 15 गोदामं जळून खाक झाली. सुदैवाने या दोन्ही घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

ठाणे : मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्यात काल (3 जून) रात्री दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. ठाण्यातील बदलापूरमध्ये एका कंपनीतून वायू गळती झाल्याने आजूबाजूच्या परिसरात एकच गोंधळ उडाला होता. हा वायू तीन किमीपर्यंतच्या परिसरात पसरल्याने श्वास घेण्यात अडचणी, डोळ्यांची जळजळ असे त्रास होऊ लागले. तर भिवंडी शहरात भंगाराच्या गोदामात लागलेल्या भीषण आग लागून 15 गोदामं जळून खाक झाली. सुदैवाने या दोन्ही घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

भिवंडीत आगीचे सत्र सुरुच ; शहरातील अवचित पाडा परिसरात भंगारच्या गोदामाला भीषण आग 
भिवंडी शहरात अग्नितांडव सुरुच आहे. शहरातील अवचित पाडा परिसरात असलेल्या भंगार गोदामांना मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत एकूण 15 भंगार गोदामे जळून खाक झाली आहेत. या भंगार गोदामात कापड, चिंध्या, पुठ्ठे, प्लस्टिक, तागे, पीओपी आणि इतर भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. आगीचे नेमकी कारण अजून समजले नसून या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तसेच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान या भंगार गोदामांच्या आजूबाजूला रहिवासी घरे आणि यंत्रमाग कारखाने असल्याने आग लागल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. तसंच आगीच्या धुराने परिसरातील नागरिक हैराण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवलं. परंतु शहरात वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने या आगी लागतात की लावल्या जातात असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.

बदलापूर एमआयडीसीत रासायनिक गॅसगळती, परिसरातील लोकांना श्वास घ्यायला त्रास
बदलापूर एमआयडीसीत गुरुवारी (3 जून) रात्री अकराच्या सुमारास रासायनिक कंपनीत गॅस गळती झाली. यामुळे शिरगाव, आपटेवाडी भागात अनेक लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने मोठी घबराट पसरली होती. बदलापूर एमआयडीसीत नोबेल इंटरमिडीएट्स नावाची रासायनिक कंपनी आहे. या कंपनीतील रिऍक्टरमध्ये काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही गॅस गळती झाली. या रिअॅक्टरमध्ये सल्फ्युरिक अॅसिड आणि मिथाईल बेंझाईन एकत्र केलं जात होतं. मात्र यात सल्फ्युरिक अॅसिड जास्त पडल्यानं अचानक रिअॅक्टरमधून गॅस लीक झाला आणि परिसरात पसरला. हा गॅस ज्वलनशील नसला, तरी त्यामुळे परिसरातल्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होणं, डोळे जळजळणं असे त्रास होऊ लागले. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही गळती रोखली. तसंच रिअॅक्टरचं कुलिंग ऑपरेशन केलं. या घटनेत कुणालाही इजा झालेली नसून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती मुख्य अग्निशमन विभागाने दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Helicopter crash : माणूसकी मदतीला धावली; हेलिकॉप्टर अपघाग्रस्तांसाठी हॉटेलमधील 'वेटर बनले देवदूत'
माणूसकी मदतीला धावली; हेलिकॉप्टर अपघाग्रस्तांसाठी हॉटेलमधील 'वेटर बनले देवदूत'
UPS Scheme: मोठी बातमी! मोदी सरकारचं सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट; UPS पेन्शन योजनेची घोषणा
मोठी बातमी! मोदी सरकारचं सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट; UPS पेन्शन योजनेची घोषणा
मोठी बातमी : मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ असणार, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर
मोठी बातमी : मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ असणार, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर
धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच केला अत्याचार, आरोपी जेरबंद, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच केला अत्याचार, आरोपी जेरबंद, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Washim News : धक्कादायक! 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, वाशिमच्या रिसोडमधील घटनाJitendra Awhad On Badlapur Crime : राज्यातील अत्याचार प्रकरणांवर मविआच्या बैठकीत चर्चाNepal Accident : नेपाळमध्ये बस दुर्घटना, मृतदेह घेण्यासाठी 26 अॅम्बुलन्स जळगाव विमानतळावर दाखलJayant Patil on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना टिकणार नाही, जयंत पाटलांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Helicopter crash : माणूसकी मदतीला धावली; हेलिकॉप्टर अपघाग्रस्तांसाठी हॉटेलमधील 'वेटर बनले देवदूत'
माणूसकी मदतीला धावली; हेलिकॉप्टर अपघाग्रस्तांसाठी हॉटेलमधील 'वेटर बनले देवदूत'
UPS Scheme: मोठी बातमी! मोदी सरकारचं सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट; UPS पेन्शन योजनेची घोषणा
मोठी बातमी! मोदी सरकारचं सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट; UPS पेन्शन योजनेची घोषणा
मोठी बातमी : मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ असणार, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर
मोठी बातमी : मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ असणार, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर
धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच केला अत्याचार, आरोपी जेरबंद, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच केला अत्याचार, आरोपी जेरबंद, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Gold Rates Today: जन्माष्टमीपूर्वी सलग दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त, जाणून घ्या सोन्याचांदीचे भाव
'सुवर्ण'संधी! जन्माष्टमीपूर्वी सलग दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त, जाणून घ्या सोन्याचांदीचे भाव
मी जळगावात येतोय, 11 लखपती दीदींना प्रमाणपत्र देणार; नरेंद्र मोदी प्रतिभाताईंना भेटणार
मी जळगावात येतोय, 11 लखपती दीदींना प्रमाणपत्र देणार; नरेंद्र मोदी प्रतिभाताईंना भेटणार
मेरी मर्जी..  सदावर्ते दाम्पत्याचा नाद खुळा; कॅरेबियन लूकमध्ये जयश्री पाटील
मेरी मर्जी.. सदावर्ते दाम्पत्याचा नाद खुळा; कॅरेबियन लूकमध्ये जयश्री पाटील
Helicopter crash Video : देव तारी त्याला कोण मारी, क्षणात हेलिकॉप्टर कोसळलं; अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ
Video : देव तारी त्याला कोण मारी, क्षणात हेलिकॉप्टर कोसळलं; अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ
Embed widget