एक्स्प्लोर
Advertisement
हायकोर्टाच्या निर्णयानंतर तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात
मुंबईः हायकोर्टाच्या निर्णयानंतर भूमिता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी मुंबई येथील हाजी अली दर्ग्यात प्रवेश केला. पूर्वी महिलांना प्रवेश दिला जात असे, त्या ठिकाणापर्यंतच तृप्ती देसाई यांनी प्रवेश केला. मात्र ट्रस्टला सुप्रीम कोर्टात अपील करण्यासाठी दिलेल्या 6 महिन्यांच्या मुदतीमुळे घालण्यात आलेल्या बंदीचं पालन करत त्या मजारचं दर्शन न घेताच परतल्या.
महिला प्रवेशासाठी अनेक हल्ले देखील सहन करावे लागले. मात्र हायकोर्टाच्या निर्णयामुळे नारी शक्तिचा विजय झाला, असं तृप्ती देसाईंनी सांगितलं. हाजी अली ट्रस्ट या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अपील करणार आहे. सुप्रीम कोर्टही हायकोर्टाप्रमाणेच निर्णय देईल, असा विश्वास तृप्ती देसाईंनी बोलून दाखवला.
जिथे पुरुषांना जाण्याची परवानगी आहे, तिथे महिलांनाही जाण्याचा अधिकार आहे, असं म्हणत मुंबई हायकोर्टाने हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशाची बंदी उठवली. पुरुषांप्रमाणे महिलांनाही हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळावा यासाठी, डॉ. नुरजा नियाज आणि इतर संघटनांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय दिला.
संबंधित बातम्याः
हाजी अली दर्ग्यात महिलांनाही प्रवेश, हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
हाजी अली दर्ग्याचा वाद नेमका काय?
सरकारच्या दबावाला बळी पडून कोर्टाचा हा निर्णय: हाजी अली ट्रस्ट
हाजी अली दर्गा प्रवेश: हायकोर्टाचा नेमका निर्णय काय?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement