एक्स्प्लोर
मुंबईत मालवणीमध्ये आजी आणि दोन नातवंडांची हत्या

मुंबई : मुंबईतल्या मालाडजवळ मालवणी भागात तिहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. एकाच परिवारात राहणाऱ्या तिघांची हत्या करण्यात आली आहे. न्यू कलेक्टर कॉलनीत प्लॉट नंबर 23 वर रुम नंबर 92 मध्ये राहणाऱ्या शॉ कुटुंबीयांमध्ये तिहेरी हत्याकांड घडलं. मृतांमध्ये आजी आणि तिच्या दोन नातवंडांचा समावेश आहे. 47 वर्षीय बबली शॉ असं महिलेचं नाव असून 13 वर्षांचा आर्यन इस्माईल शेख आणि 8 वर्षांची सानिया इस्माईल शेख यांची हत्या झाली. अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण चाकूने वार करुन तिघांची हत्या केली आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























