एक्स्प्लोर
Advertisement
सरकारी अधिकाऱ्याकडे घबाड, उत्पन्नापेक्षा 208 टक्के जास्त संपत्ती
वरिष्ठ सरकारी अधिकारी विकास रसाळ यांच्याकडे उत्पन्नापेक्षा 208 टक्के जास्त संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई : वरिष्ठ सरकारी अधिकारी विकास रसाळ यांच्याकडे उत्पन्नापेक्षा 208 टक्के जास्त संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
विकास रसाळ हे नवी मुंबईतील आयर्न अँड स्टील मार्केटचे सीईओ आहेत.
6 जुलै रोजी विकास रसाळ हे प्रमोटी आयएएसच्या मुलाखतीसाठी दिल्लीला जात होते. त्यावेळी आयकर विभागाने त्यांच्याकडून 65 लाख 80 हजार रुपयांची रक्कम जप्त केली. त्यानंतर विकास रसाळ चौकशीच्या फेऱ्यात आले.
रक्कम जप्त केल्याचं आयकर विभागने लाचलुचपत विभागालाही कळवलं. त्यानंतर रसाळ यांची चौकशी सुरु झाली. या चौकशीदरम्यान रसाळ यांच्याकडे उत्पन्नापेक्षा 208 टक्के अधिकची संपत्ती म्हणजेच 14 कोटी 39 लाख 16 हजार 253 रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झालं.
एवढ्या मोठ्या रकमेचा स्रोत दाखवता न आल्याने विकास रसाळ यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरोधात कळंबोलीमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, 65 लाखांहून अधिकची रक्कम विकास रसाळ दिल्लीत कुणासाठी घेऊन जात होते, ती लाचेसाठी रोकड होती का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नागपूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement