एक्स्प्लोर
Advertisement
आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक
अभियांत्रिकी कामांसाठी आज मुंबईतील पश्चिम, मध्य, आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : अभियांत्रिकी कामांसाठी आज मुंबईतील तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रूझ आणि माहीम स्थानकादरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावरील दिवा-कल्याण जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावर पनवेल ते नेरूळ मार्गावर मेगाब्लॉक असेल.
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ ते माहीम स्थानकादरम्यान 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील जलद गाड्या सांताक्रूझ ते माहीमदरम्यान धिम्या मार्गावर चालवण्यात येतील.
तर मध्य रेल्वे मार्गावरील दिवा-कल्याण जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मेगाब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून (सीएसएमटी) सुटणाऱ्या जलद लोकल सकाळी 9.25 ते दुपारी 2.54 वाजेपर्यंत घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी आणि भांडुप स्थानकात थांबतील. यानंतर या सर्व लोकल ठाणे ते कल्याणदरम्यान धिम्या मार्गावरून चालवल्या जातील.
तर कल्याणमधून सकाळी 10.37 ते दुपारी 3.06 दरम्यान सुटणाऱ्या जलद लोकल दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर या स्थानकात थांबतील. त्यामुळे सीएसएमटीहून होणारी लोकल वाहतूक सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 10 मिनिटे उशिराने होईल.
हार्बर मार्गावरही आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील पनवेल ते नेरूळ दरम्यान सकाळी 11.06 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे पनवेल/ बेलापूर ते सीएसएमटी या मार्गावरील वाहतूक 10.03 ते दुपारी 4.28 वाजेपर्यंत बंद असेल. या मेगा ब्लॉक काळात सीएसएमटी ते नेरूळ दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येईल.
हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकचा परिणाम ट्रान्स हार्बरवरही होणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-पनवेल दरम्यानची वाहतूक सकाळी 11.14 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि पनवेल-ठाणे दरम्यानची वाहतूक सकाळी 11.02 ते दुपारी 4.26 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement