![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1135; दिवसभरात 117 नव्या रूग्णांची भर, पुण्यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 135 वर गेली आहे. आज दिवसभरात 117 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आणखी तिसऱ्या स्टेजचा संसर्ग आढळला नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
![राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1135; दिवसभरात 117 नव्या रूग्णांची भर, पुण्यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू today 117 new patients of corona in maharashtra total count is 1135 राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1135; दिवसभरात 117 नव्या रूग्णांची भर, पुण्यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/08235241/WEB_CoronaAlert.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग आता वेगाने होताना दिसत आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हजारच्या पार गेला. तर, आज तब्बल एकाच दिवसात 117 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. परिणामी राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 1135 झाला आहे. कोरोनामुक्त झाल्याने 120 जणांना आज घरी सोडण्यात आले. दरम्यान, पुण्यात आज पुण्यात तीन जणांचा मृत्यू झाला. मागील मागील 24 तासात शहरात आठ जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. पुण्यात एकूण मृतांचा आकडा 16 वर गेला आहे. अद्याप राज्यात तिसऱ्या स्टेजचा संसर्ग सुरु झाली नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
राज्यात कोरोनाचा विषाणू वेगाने पसरत आहे. मागील आठवड्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढली आहे. यात मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 500 च्या वर केलीय. त्याखालोखाल पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मुंबई आणि पुणे शहरात काही ठिकाणं हॉटस्पॉट म्हणून घोषीत करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील असलेले भाग आता सील करण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. अशी ठिकाणं आता प्रशासनाकडून सील करण्यात येत आहे.
अजित डोवाल यांना भेटल्यावर मर्कजचे मौलाना कुठे पळाले, गृहमंत्री अनिल देशमुखांचा केंद्राला सवाल
राज्यात तिसरी स्टेज नाही राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची तिसरी स्टेज राज्यात सुरु झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. राज्यात जरी वेगाने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी ही तिसरी स्टेज नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. पहिल्या स्टेजमध्ये बाहेरुन आलेले लोक कोरोना पॉझिटिव्ह असतात. तर, दुसऱ्या स्टेजमध्ये बाहेरुन आलेल्या लोकांमुळे स्थानिकांना याची लागण होण्यास सुरुवात होते. तर, तिसऱ्या स्टेजमध्ये कोरोनाची लागण कम्युनिटीमध्ये पसरते, असे ह्या संसर्गाचे प्रकार समजले जातात.
वडिलांच्या अंत्यविधीसाठी पुण्यातील याचिकाकर्त्याला आसामपर्यंत जाण्याची हायकोर्टाकडून परवानगी
सोशल डिस्टन्स पाळा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढू नये म्हणून प्रशासनाकडून वारंवार सोशल डिस्टन्स पाळण्यास सांगितलं जात आहे. मात्र, तरीही लोक विनाकारण रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. भाजी मंडई असेल किंवा अन्य ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळण्यास सांगितले जात आहे. मात्र, काही लोक अद्यापही याचे अनुकरण करताना दिसत नाही. त्यामुळे परिणामी आम्हाला कठोर व्हावं लागेल, असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचंही आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
Police Route March | लॉकडाऊनच्या सूचना गांभिर्याने घेण्यासाठी पुणे पोलिसांचं रूट मार्च
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)