एक्स्प्लोर

वाढदिवस साजरा करायला कार घेऊन समुद्रकिनारी जाणं जीवावर बेतलं; अक्सा बीचवर एकाचा मृत्यू 6 जखमी

वाढदिवस साजरा करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर जाणं सात युवकांना चांगलंच महागात पडलं आहे. समुद्रकिनारी भरधाव वेगात बोलेरो घेऊन जात असताना किनाऱ्यावर मोठी लाट आली अन् झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. 

मुंबई : वाढदिवस साजरा करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर जाणं सात युवकांना चांगलंच महागात पडलं आहे. समुद्रकिनारी भरधाव वेगात बोलेरो घेऊन जात असताना किनाऱ्यावर मोठी लाट आली अन् झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. सात मित्र बोलेरो कार घेऊन अक्सा बीचवर गेले होते त्यावेळी ही घटना घडली.  घाटकोपर पश्चिममध्ये राहणारे सात जण वाढदिवस साजरा करण्यासाठी मालाड अक्सा समुद्रकिनारी पोहोचले. या 7 तरुणांनी नियमांकडं दुर्लक्ष केल्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले. कार समुद्रकिनाऱ्यावर घेऊन गेल्यानंतर लाटांच्या तडाख्यात आदळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले आहेत.

राहुल यादव असं मृत तरुणाचं नाव आहे. राहुल आणि त्याचे मित्र अक्षय नावाच्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त बीचवर गेले होते. मालाडच्या अक्सा बीचवर वाढदिवसाची पार्टी आणि मौजमजा करण्यासाठी गेले. मात्र सर्व मित्रांनी बोलेरो पार्किंगमध्ये उभी करण्याऐवजी बीचवर घेऊन गेले. समुद्रकिनारी भरधाव वेगात बोलेरो चालवत असताना वेग जास्त असल्याने आणि त्याचवेळी किनाऱ्यावर मोठी लाट आली. यात बोलेरोच्या बोनेटवर आदळल्यानं राहुल यादव गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.

या घटनेत इतर 6 मित्रही गंभीर जखमी झाले आहेत. तिथं उपस्थित असलेल्या लाइफगार्ड सुरक्षा रक्षकांनी कारची काच फोडली आणि उर्वरित 6 जणांना गाडीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी एडीआरची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?

एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड

तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Amol Mitkari On Ajit Pawar 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अजित पवारांना अमोल मिटकरांचं भावनिक पत्र
Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका
NCP Merger : विलिनीकरणाचा फायदा, तोटा कुणाला? राष्ट्रवादींची गणितं कधी सुटणार?
Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार

Embed widget