एक्स्प्लोर

क्रुझ पार्टीतील 'त्या' तीन लोकांना सोडण्यातच सर्वात मोठा खेळ; नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

Mumbai Cruise Drug Case: मुंबई क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एक गौप्यस्फोट केलाय. या प्रकरणी अनेक दावे करत पुन्हा एकदा नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधलाय.

Nawab Malik on Mumbai Cruise Drug Case : आज अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एक नवा गौप्यस्फोट केला आहे. नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणाचा पाढा वाचत या फर्जीवाड्यातील अनेक गोष्टी समोर ठेवत, नवे दावे केल. तसेच पुन्हा एकदा एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर निशाणा साधत अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. 

आज नवाब मलिक पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, "2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळपर्यंत बातमी आली होती की, कॉर्डिलिया क्रूझवर रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक बातम्या पसरल्या की, एका मोठ्या सेलिब्रिटीच्या मुलाला या रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी आर्यन खानसह आठ जणांना अटक केल्याची बातमी आली आणि 6 ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर मी सांगितलेलं की, रेव्ह पार्टीच संपूर्ण प्रकरण बोगस आहे. आणि हा फर्जीवाडा चव्हाट्यावर आणत दोन व्यक्तींचा व्हिडीओ आम्ही सार्वजनिक केला होता. एक व्यक्ती केपी गोसावी, जो आर्यन खानला एनसीबी मुख्यालयात घेऊन जाताना दिसला होता. तर दुसरा अरबाज मर्चंटला घेऊन जाणाऱ्या मनिष भानुशाली नावाच्या व्यक्तीचा व्हिडीओ होता. या दोन्ही व्यक्ती यापूर्वीही एनसीबीच्या मुख्यालयात जाताना दिसले होते. आम्ही विचारलं होतं या दोन व्यक्ती कोण आहेत? जे हाय प्रोफाइल व्यक्तीला एनसीबी मुख्यालयात घेऊन जात आहेत? तीन वाजता आमची पत्रकार परिषद झाली होती. त्यानंतर पाच वाजता एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की, या दोन्ही व्यक्ती या प्रकरणातील पंच आहेत."  

आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज तर समीर वानखेडे पार्टनर, नवाब मलिकांचा मोठा आरोप 

"त्यावेळी प्रश्न उपस्थित होत होते की नवाब मलिक असे सवाल का उपस्थित करत आहेत. त्यावेळी त्यांनी म्हंटल होत की, माझ्या जावयावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे मी बोलत आहे. मी त्यावेळी बोललो होतो की, 13 जानेवारीला माझ्या जावयाला अटक करण्यात आली होती. पत्रकार परिषदेत बोलताना पत्रकारांनीही मला विचारलं होतं, त्यावेळी मी बोललो होतो जर गुन्हा केला असेल तर कारवाई होणार.", असंही नवाब मलिकांनी स्पष्ट केलं आहे. 

"त्यानंतर आम्ही 9 तारखेला पुन्हा पत्रकार परिषद घेतली. एक व्हिडीओ आम्ही तुमच्यासमोर ठेवला त्यामध्ये समीर वानखेडे आम्ही क्रूझ पार्टी ड्रग प्रकरणी 8 ते 9 जणांना ताब्यात घेतल्याचं बोलत होते. मी त्यावेळीही विचारलं होतं की, एक वरिष्ठ अधिकारी निश्चितपणे का सांगत नव्हता की, 8 जण होते की, 9 जण होते. त्यानंतर आम्ही त्याच दिवशी पुन्हा एक नवा व्हिडीओ जारी केला. त्यामध्ये 8 जण नाही, तर 11 जण असल्याचं स्पष्ट झालं होतं.", असं नवाब मलिक म्हणाले. 

नवाब मलिक म्हणाले की, "मी समीर वानखेडे यांच्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी 11 लोकांना एनसीबीने पकडलं होत असे जाहीर केले होते. त्यावेळी मी अमीर फर्निचरवाला, रिषभ सचदेवा यांना घेऊन जाताना त्याचे चुलते दिसत होते. त्यावेळी आम्ही बोललो होतो की मोहित भारतीय जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांचा मेहुणा आहे. त्यावेळी वानखेडे बोलले की 14 लोकांना आम्ही पकडलं होत. त्यावेळी त्यांना नावं जाहीर करा असे बोललो होतो मात्र त्यांनी नावं जाहीर केलं नाही."

सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही

नवाब मलिकांनी सांगितलं की, सुनील पाटील याला मी कधीही भेटलो नाही. सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही. सुनील पाटील हा भाजपच्या मंत्र्यांसोबत फिरत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होताना पाहिला मिळत आहेत. तो कोणत्या पार्टीचा व्यक्ती आहे हे मी बोलत नाही, असं मलिक म्हणाले. सुनील पाटील हा समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीचा भाग आहेत. 6 तारखेला पाहिल्यादा मला सुनील पाटीलचा फोन आला. तो येतो बोलला त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील फोन आला मात्र तो आला नाही. तो आज येणार होता परंतु आज अखेर तो आलेला नाही, असंही मलिक म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

नवाब मलिकांकडून ऑडियो क्लिप ट्वीट, सॅनविल आणि NCB अधिकाऱ्यातील संवाद, नेमकं काय आहे त्यात...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget