एक्स्प्लोर
मुंबई विमानतळाजवळ ड्रोन उडवणाऱ्या तिघांना अटक
मुंबई : मुंबईत विमानतळ परिसरात ड्रोन उडवणाऱ्या तिघांना मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाईन्सच्या पायलटने याविषयी तक्रार केली होती.
राहुल जयस्वाल, राणा सुभाष सिंह, विधीचंद जयस्वाल अशी तिघांची नावं आहेत. इंडिगो एअरलाईनच्या पायलटला विमानतळाजवळ संशयास्पद ड्रोन उडताना आढळल्याने त्याने एअरपोर्ट ट्राफिक कंट्रोलला याची माहिती दिली होती.
तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी करत शहरात अलर्ट जारी केला होता. चारकोप पोलिसांनी तपासानंतर तिघांना अटक केली आहे.
चित्रपट शूटची तयारी :
पोलिसांनी दोन ड्रोन कॅमेरा आणि एक आयपॅड जप्त केला आहे. राहुल आणि राणा सुभाष यांनी चित्रपट निर्मितीपूर्वी ड्रोनची ट्रायल घेत असल्याचा दावा केला आहे. विधीचंद जयस्वाल हा ड्रोन भाड्याने देतो. ड्रोनने मुंबईतल्या कोणकोणत्या भागात शूटिंग करण्यात आलं आहे, याचाही शोध पोलिस घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement