एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चालत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये महिलेची हत्या
जीआरपीने महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून मुंबई सेंट्रल जीआरपीएफने हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. चोरीच्या हेतूने दाडिया देवी यांची हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या गळ्यावर, दोन्ही हातावर आणि छातीवर धारदार शस्त्राचे वार केले आहेत.
मुंबई : सूरतवरून मुंबईकडे येणाऱ्या भुज-दादर सुपरफास्ट एक्सप्रेसमधील महिला डब्यामध्ये शुक्रवारी एका 40 वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली. आरपीएफचे जवान गाडी चेक करत असताना त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आला.
मृत महिलेचे नाव दाडिया देवी शंकर चौधरी (40) असून ती सूरतची राहणारी आहे. वडाळ्यात राहणाऱ्या बहिणीला त्या मुंबईला भेटायला आल्या होत्या. दाडिया देवीचे पती सूरतमध्ये एका कपड्याच्या दुकानमध्ये काम करत असून त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भुज-दादर सुपरफास्ट एक्सप्रेस आपल्या निश्चित वेळेत 12.10 वाजता दादर स्टेशनवर आली. यावेळी आरपीएफचे जवान गाडी चेक करत असताना महिला डब्ब्यापर्यंत पोहचले. तेव्हा त्यांना त्या डब्ब्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर आरपीएफ जवानांनी जीआरपीएफला याबाबत सूचना दिली.
जीआरपीने महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून मुंबई सेंट्रल जीआरपीएफने हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. चोरीच्या हेतूने दाडिया देवी यांची हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या गळ्यावर, दोन्ही हातावर आणि छातीवर धारदार शस्त्राचे वार केले आहेत.
ज्या ट्रेनमध्ये हा मृतदेह आढळला ती एक्सप्रेस सूरतनंतर महाराष्ट्रात वसई, बोरीवली आणि दादरला थांबते. जीआरपीएफ द्वारे सर्व स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले जात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
लाईफस्टाईल
निवडणूक
Advertisement