एक्स्प्लोर
Advertisement
आवाज सहन न झाल्याने शाळा विश्वस्तांच्या पत्नीची विद्यार्थ्यांना मारहाण
बाकडे हलवण्याचा आवाज सहन न झाल्यामुळे ट्रस्टींच्या पत्नी शिल्पा गौतम वैतागल्या आणि त्यांनी फायबरच्या काठीने 18 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे.
ठाणे : वार्षिक स्नेहसंमेलनाचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज शाळेच्या ट्रस्टींच्या पत्नीला सहन झाला नाही. याच चिडचिडीतून महिलेने 18 विद्यार्थ्यांना फायबारच्या काठीने मारल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. शाळेचे विश्वस्त गौतम यांची पत्नी शिल्पा गौतम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील बाजारपेठेत असलेल्या गौतम शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी सुरु आहे. त्यासाठी बुधवारी काही विद्यार्थी सराव करत होते. सरावासाठी जागा लागणार असल्यामुळे त्यांनी वर्गातील बेंच हलवण्यास सुरुवात केली.
बाकडे हलवण्याचा आवाज सहन न झाल्यामुळे ट्रस्टींच्या पत्नी वैतागल्या. रागातून शिल्पा गौतम यांनी फायबरच्या काठीने 18 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे.
मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना यासंदर्भात माहिती दिल्यानंतर पालकांनी शाळेत गोंधळ घातला आणि शिल्पा गौतम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
हा वाद ठाणे नगर पोलिस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी मारहाण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हील रुग्णालयात पाठवलं. रात्री उशिरापर्यंत या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु होते. मुलाच्या हाताला सूज आणि खरचटल्याच्या जखमा असल्याने 15 वर्षीय अतुल सुनील शर्मा याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिल्पा गौतमविरोधात गुन्हा दाखल केला.
मारहाणीचा प्रकार अमानुष असून शाळेत अशा पद्धतीने गंभीर मारहाण होत असेल, तर मुलांना कोणाच्या विश्वासावर सोडायचं असा प्रश्न पालक विचारत आहेत. याबाबत शाळा प्रशासन आणि ट्रस्टींनी मात्र माध्यमांशी बोलण्यास टाळलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement