एक्स्प्लोर
तक्रार केल्याने पोलिसाचा संताप, मित्राच्या अंगावर गाडी घातली
ठाणे : पोलिसाची तक्रार करणं ठाण्यातील एका युवकाला चांगलंच महागात पडलं आहे. आर्थिक वादानंतर संबंधित तरुणाने तक्रार केल्यामुळे चिडलेल्या पोलिसाने चक्क आपली गाडीच त्याच्या अंगावर घातली. सुदैवाने तक्रारदार या हल्ल्यातून बचावला आहे.
मित्रासोबत झालेल्या बाचाबाचीनंतर पोलिस कॉन्स्टेबलनं चक्क त्याच्या अंगावर गाडी घातली. मुंबई पोलिसांच्या स्पेशल क्राईम ब्रांचचे कॉन्स्टेबल रमेश आवटे यांनी अतुल पेठे यांना सरळ आपल्या गाडीखाली घातलं.
21 एप्रिलला ठाण्यातील पाचपाखाडी भागातल्या प्रशांत कॉर्नरच्या बाहेर घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आवटेंनी पेठेंच्या अंगावर इनोव्हा घातली, मात्र पेठेंनी तात्काळ गाडीच्या बॉनेटवर झेप घेतल्यामुळे ते बचावले.
यानंतर काही अंतर फरफटत गेलेल्या पेठेंना समोरुन येणाऱ्या एका भरधाव ट्रकनं चिरडलं असतं, मात्र लोकांनी आरडाओरडा केल्यानं पेठे थोडक्यात बचावले.
पेठे यांचा आईस्क्रिमचा व्यवसाय असून आयपीएस परीक्षेची तयार करतात. पेठे आणि आवटे जुने मित्र असून आवटेनं पेठेंच्या आईकडून 3 लाख रुपये उधार घेतले होते. मात्र ही उधारी चुकवण्यास आवटेंनी नकार दिल्यानं त्यातून हा वाद घडला होता.
यासंदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अजूनही या पोलिस कर्मचाऱ्याला अटक झालेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement