दसरा मेळावा शिवाजी पार्कात घेण्यासाठी ठाकरे गट आक्रमक; पुन्हा पाठवणार पत्र, मनपा सहाय्यक आयुक्तांना दोन दिवसांचा अल्टिमेटम
Shivsena Dasara Melava: दसरा मेळाव्यासाठी दोन्हीही शिवसेनेचे गट मैदानात उतरलेले असताना शिवाजी पार्क मैदान हे आमच्याच गटाला मिळावं, यासाठी दोन्ही गटांकडून पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळू शकतो.
Shivsena Dasara Melava Row : दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava 2023) सभेला शिवाजी पार्क मैदानासाठी (Shivaji Park Ground) ठाकरेंची शिवसेना (Shiv Sena : Uddhav Balasaheb Thackeray) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) सहाय्यक आयुक्तांना दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात येणार आहे. तसेच, आज पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून एक पत्र मुंबई महापालिकेला (BMC) पाठवलं जाणार आहे. जर दोन दिवसांत शिवाजी पार्क मैदानाबाबत निर्णय नाही दिला, तर मात्र वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार ठाकरे गट (Thackeray Group) पुढील भूमिका घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी (Dussehra Melava) शिवसेनेच्या दोन्ही गटांनी परवानगी अर्ज दाखल केल्यानं प्रशासनासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
दसरा मेळाव्यासाठी दोन्हीही शिवसेनेचे गट मैदानात उतरलेले असताना शिवाजी पार्क मैदान हे आमच्याच गटाला मिळावं, यासाठी दोन्ही गटांकडून पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळू शकतो. दोन्ही गटांनी शिवाजी पार्क आपल्याला दसरा मेळाव्यासाठी मिळावा, यासाठी महिन्याभरापूर्वीच एक पत्र बीएमसी विभागीय कार्यालयाला पाठवलं आहे. आता याच पत्रावर निर्णय घेण्याआधी मुंबई महापालिका विधी विभागाचं मार्गदर्शन घेते आहे.
दरम्यान, शिवसेनेचा दसरा मेळावा ही शिवसेनेची खास ओळख. बाळासाहेब ठाकरेंची विशेष आठवण आणि शिवसैनिकांचा उत्साह म्हणजे दसरा मेळावा. 2021 पर्यंत दसरा मेळावा म्हणजे, शिवसेनेचाच आणि शिवाजी पार्कवर आव्वाज कुणाचा तर ठाकरेंचा हीच ओळख होती. पण शिवसेना फुटली आणि दसरा मेळाव्याला वादाचं ग्रहण लागलं. यंदाही तेच ग्रहण कायम आहे. त्यामुळे येत्या दसऱ्याला शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार शिंदेंचा की, ठाकरेंचा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट आग्रही; शिंदे गटाचा 'प्लॅन बी' काय?