(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tansa River : गटारी साजरी करण्यासाठी गेलेले 5 जण गाडीसह तानसा नदीत वाहून गेले
Mumbai, Tansa River : तानसा धरणाच्या (Tansa Dam) खाली गटारीची पार्टी साजरी करण्यासाठी आलेल्या पाच जण गाडीसह तानसा नदीत (Tansa River) वाहून गेल्याची घटना घडली आहे.
Mumbai, Tansa River : तानसा धरणाच्या (Tansa Dam) खाली गटारीची पार्टी साजरी करण्यासाठी आलेल्या पाच जण गाडीसह तानसा नदीत (Tansa River) वाहून गेल्याची घटना घडली आहे. यातील तीन जणांनी गाडीच्या बाहेर उड्या मारल्या त्यामुळे ते बचावले. मात्र दोन जण गाडीत अडकले होते. यापैकी एकाचा मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले तर एकजण अद्याप बेपत्ता आहे. गणपत चिमाजी शेलकंदे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
पाच जणांपैकी तिघांनी गाडीच्या बाहेर उडी मारल्याने जीव वाचला
शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात कल्याण-मुंबई वरून गटारी साजरी करण्यासाठी पाच जण आले होते. तानसा धरणाच्या गेट नंबर एकच्या खाली दुपारी पार्टी गाडीत बसून पार्टी करीत असताना अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाला. यामध्ये पाच जण गाडीसह नदीच्या प्रवाहात वाहून गेले. तसेच या पाच जणांपैकी तिघांनी गाडीच्या बाहेर उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र दोन जण गाडीत अडकले होते, यात गणपत चिमाजी शेलकंदे (रा.कल्याण) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. मात्र एकजण आद्याप ही बेपत्ता असून त्याचे शोधकार्य सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या