एक्स्प्लोर
'त्या' लिंकवर क्लिक केल्याने टॅब हॅक, 2 लाखांचं मोबाईल बिल
मुंबईतील पवईत भागात एका कंपनीचा 'टॅब' हॅक झाल्यामुळे चक्क दोन लाख रुपयांचं बिल आलं आहे.
मुंबई : मोबाईलवर मेसेजमध्ये आलेल्या कोणत्याही लिंक तुम्ही क्लिक करत असाल, तर सावध व्हा. तुम्हाला लाखो रुपयांचं मोबाईल बिल येऊ शकतं. मुंबईतील पवईत भागात एका कंपनीचा 'टॅब' हॅक झाल्यामुळे चक्क दोन लाख रुपयांचं बिल आलं आहे.
पवईच्या हिरानंदानी भागात असलेल्या 'दि ए टीम' ही इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीने त्यांच्या कार्यालयात एक मोबाईल टॅब नोंदणीसाठी ठेवला होता. यामध्ये एअरटेल कंपनीचे दोन सिम कार्ड होते. दोन्ही सिमकार्डचे मिळून अचानक दोन लाख 453 रुपयांचं बिल आल्याने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला धक्का बसला.
एअरटेलकडे याबाबत चौकशी केली असता, 8190 या नंबरवर कोरियन आणि जपानी भाषेत तब्बल 21 हजार मेसेज केले गेल्याचं समोर आलं. सिमकार्ड बदलून पहिल्यावर दुसऱ्या सिमकार्डवरुनही मेसेज आपोआप जात असल्याचं त्यांना समजलं.
या प्रकरणी 'दि ए टीम' ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने पवई पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. एका मेसेजमध्ये आलेली लिंक क्लिक केल्याने टॅबच हॅक केला गेल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 43 आणि 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement