एक्स्प्लोर
रविवार नवी मुंबईकरांसाठी अडचणीचा, हार्बर, ट्रान्सहार्बरवर मेगाब्लॉक
रविवारी मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक आहे.
![रविवार नवी मुंबईकरांसाठी अडचणीचा, हार्बर, ट्रान्सहार्बरवर मेगाब्लॉक Sunday mega block on Harbor and trans harbor रविवार नवी मुंबईकरांसाठी अडचणीचा, हार्बर, ट्रान्सहार्बरवर मेगाब्लॉक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/21190651/harbour-train.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फाईल फोटो
मुंबई : नवी मुंबईकरांसाठी रविवार अडचणीचा ठरणार आहे. कारण, उद्या (रविवार) मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक आहे.
हार्बर मार्गावर पनवेल ते मानखुर्द दरम्यान सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. तर ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4.30 पर्यंत हा मेगाब्लॉक असेल.
या काळात रेल्वेसेवा खंडीत राहिल. त्यामुळे या काळात नवी मुंबईत पोहोचण्यासाठी किंवा नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी तुम्हाला रस्ते मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
शिवाय हार्बर मार्गावरील पनवेल ते अंधेरी ही सेवाही या काळात बंद राहिल. यामुळे नवी मुंबईकरांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेवरही कल्याण ते ठाणे दरम्यान स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. या काळात स्लो मार्गावरची वाहतूक फास्ट मार्गावर वळवण्यात येईल. सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा या स्थानकात थांबणार नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)