एक्स्प्लोर
सुभाष देशमुखांकडून एपीएमसीची झाडाझडती
भाजीपाला नियमन मुक्त करणे तसेच इतर अनेक नवीन कायद्यांना असलेल्या विरोधावर बोलताना त्यांनी केंद्र शासनाशी बोलून याबाबत निर्णय घेण्याचे सूतोवाच केले. मार्केट आवारातील समस्यांचा आढावा घेताना त्यांनी संपूर्ण परिसर पाहणी केली.

नवी मुंबई : पणन विभागाकडून बदलत्या कायद्याला अनुसरून पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी एपीएमसीला सकाळी भेट देत झाडाझडती घेतली. एपीएमसीमधील समस्या जाणून घेण्याची मागणी पणन मंत्र्यांना केली होती. या धर्तीवर सुभाष देशमुख यांनी नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसराची पाहणी केली.
यावेळी देशमुख यांनी व्यापारी आणि माथाडी कामगारांना येणाऱ्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. मार्केट मध्ये कसा लिलाव होतो? टाळी वाजवत भाजीचे दर कसे ठरले जातात? आयात-निर्यातीची काम कशी चालतात? या सर्वांची पाहणी पणन मंत्र्यांनी केली. एपीएमसी परिसरात व्यापार करताना व्यापाऱ्यांना जागेच्या कमतरतेवर लवकरच तोडगा काढू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भाजीपाला नियमन मुक्त करणे तसेच इतर अनेक नवीन कायद्यांना असलेल्या विरोधावर बोलताना त्यांनी केंद्र शासनाशी बोलून याबाबत निर्णय घेण्याचे सूतोवाच केले. मार्केट आवारातील समस्यांचा आढावा घेताना त्यांनी संपूर्ण परिसर पाहणी केली. तसेच फळ मार्केट आवारात देखील त्यांनी समस्या जाणून घेतल्या.
माथाडी कामगारांचे बोर्ड स्थापन करण्यासंदर्भात तसेच वेतन समस्या, ग्रोसरी बोर्ड, खरेदी विक्रीबाबत येणाऱ्या समस्या याचा देखील त्यांनी आढावा घेतला. सोबतच लिलाव गृहातील आढावा घेवून यामध्ये देखील सुधारणा करण्याबाबत उचित निर्णय घेण्याचे संकेत देशमुख यांनी दिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
अकोला
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
