एक्स्प्लोर
विद्यार्थ्यांसाठी ‘बेस्ट’चा प्रवास महागणार, दरवाढीचा प्रस्ताव मांडणार

फाईल फोटो
मुंबई: मुंबईत जे विद्यार्थी बेस्टनं प्रवास करतात त्यांना यापुढं जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण बेस्ट विद्यार्थ्यांच्या पासच्या तसंच सवलतीच्या तिकीटाच्या दरात दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आज बेस्ट समितीची बैठक होणार आहे, यामध्ये हा प्रस्ताव मांडला जाईल. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तोट्यामुळं बेस्टनं हा निर्णय घेतला आहे. सध्या पहिल्या दोन किलोमीटर अंतराच्या मासिक पाससाठी ३६० रुपये मोजावे लागतात. आता त्यासाठी ५७५ रुपये द्यावे लागणार आहे. तिमाही पास १०६० रुपयांवरुन साधारण १७२५ रुपयांवर जाणार आहे. वातानुकूलित बसचा मासिक पास ६६० रुपयांवरुन १२०० रुपये होणार आहे.
आणखी वाचा























