एक्स्प्लोर
मुंबईत एका रात्रीत सहा दुकाने फोडली, लाखोंचा माल लंपास
दुकानांचे शटर तोडून, भिंती फोडून चोरट्यांनी दुकानांत चोरी केली. यात जवळपास 15 ते 20 लाखाचा माल लंपास केला आहे.

मुंबई : मुंबईचा भांडुप विभाग पुन्हा एकदा गुन्हेगारीने प्रकाश झोतात आला आहे. भांडुपच्या भट्टीपाडा विभागात गुरुवारी रात्री सहा दुकानांत चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरीत जवळपास 15 ते 20 लाखाचा माल लंपास केला आहे.
दुकानांचे शटर तोडून, भिंती फोडून या चोरट्यांनी चोरी केली. चोरीसाठी त्यांनी गॅस सिलेंडर, कटरचा वापर केला आहे. चोरांनी चोरीसाठी करण्यासाठी वापलेलं सामान तिथेच ठेऊन लाखोंचा माल घेऊन पोबारा केला. चोरांनी टेम्पोच्या मदतीने दुकानातील सर्व सामान आणि रोकड लंपास करून दुकाने साफ केली आहेत.
या घटनेमुळे आता भांडुपकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाली असून पंचनामा सुरु असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
