एक्स्प्लोर
काश्मीर प्रश्नाचा पकोडा उकळत्या तेलात फुटला : शिवसेना
'काश्मीर प्रश्नाचा पकोडा उकळत्या तेलातच फुटला आहे', असं म्हणत 'सामना'तून पुन्हा एकदा मोदी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला गेला आहे.
मुंबई : 'काश्मीर प्रश्नाचा पकोडा उकळत्या तेलातच फुटला आहे', असं म्हणत 'सामना'तून पुन्हा एकदा मोदी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला गेला आहे.
'देश गंभीर संकटात असताना सरकार मात्र ‘पकोडे-भजी’ यावरच्या चर्चेत गुंतवून ठेवला जात आहे, असंही 'सामना'त म्हटलं आहे.
'काँग्रेसने दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले हा आरोप जे करीत होते त्यांनी गेल्या चार वर्षांत पाकड्यांचे गुडघे फोडले काय किंवा दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले काय?' असा सवालही सामनातून मोदींना करण्यात आला आहे.
एक नजर ‘सामना’च्या अग्रलेखावर
कश्मीर प्रश्नाचा पकोडा फुटला आहे!
* पाकिस्तानला जगात एकाकी पाडल्याचे बोलले जाते, पण पाकिस्तान व त्यांचे दहशतवादी हिंदुस्थानची नाडी कश्मीरात रोज सोडत आहेत व त्यामुळे तिरंग्यास मान खाली घालावी लागत आहे. देश गंभीर संकटात असताना ‘पकोडे-भजी’ यावर चर्चेत गुंतवून ठेवायचे व कश्मीरात आमच्या जवानांनी रोजच शहीद व्हायचे. मोदी सरकारला सत्तेवर येऊन चार वर्षे झाली आहेत. कश्मीर प्रश्नाचा पकोडा उकळत्या तेलातच फुटला आहे. जवान मरत आहेत व कश्मिरी पंडित अजूनही निर्वासित आहेत.
* जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे व दिल्लीच्या धमक्या पोकळ ठरवल्या जात आहेत. गेल्या आठ दिवसांत सीमेवर ज्या घटना घडत आहेत त्या फक्त चिंताजनक नाहीत तर बलाढ्य व शक्तिमान म्हणून मिरवणाऱ्या देशाला मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत.
* गेल्या महिनाभरात पाकड्यांनी शंभरदा घुसखोरी व गोळीबार केला आणि त्यात आमचे पंधरा जवान शहीद झाले तरी आमच्या देशात ‘पकोडे’ व ‘भजी’ तळण्यावर राजकीय चर्चा सुरू आहे. पाकिस्तानला चोख उत्तर देऊ असे रोज बोलले जात आहे, पण राज्यकर्त्यांना उत्तर सापडत नाही काय? कश्मीर प्रश्नांचा सत्यानाश पंडित नेहरूंनी केला व काँग्रेस पक्षाला हा प्रश्न सोडवता आला नाही म्हणून भारतीय जनता पक्षाच्या हातात जनतेने राज्य दिले आहे. काँग्रेस पक्षाने या प्रश्नी नालायकी दाखवली व दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले हा आरोप जे करीत होते त्यांनी गेल्या चार वर्षांत पाकड्यांचे गुडघे फोडले काय किंवा दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले काय?
* पाकिस्तानला धडा शिकविण्याची हिंमत काँगेस पक्षात नव्हती, पण इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचा पराभव करून फाळणी केली होती. हिमतीचेच काम बाईंनी तेव्हा केले होते व त्या वेळी अमेरिका हिंदुस्थानच्या विरोधात पाकिस्तानच्या बाजूने होती. आज अमेरिका मोदी यांच्या खिशात आहे व फ्रान्स, जर्मनी, इस्रायलसारखी राष्ट्रे मोदींच्या तालावर डोलत असल्याचे कानावर येते. पाकिस्तानला जगात एकाकी पाडल्याचे बोलले जाते. अमेरिकेने पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्याचा आनंद दिल्लीने साजरा केला, पण पाकिस्तान व त्यांचे दहशतवादी हिंदुस्थानची नाडी कश्मीरात रोज सोडत आहेत व त्यामुळे तिरंग्यास मान खाली घालावी लागत आहे.
संबंधित बातम्या :
भजीवाल्यांची तुलना भिकाऱ्यांशी का? राज्यसभेत अमित शाह बरसले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement