एक्स्प्लोर

..अन्यथा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालवा : शिवसेना

मुंबई : राज्यातील भाजप सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर आहे, हे भाजपनं विसरु नये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी भाषा वापरली जातेय. ती वैयक्तीक मतं असू शकत नाही. अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं आहे.   भाजपमधील काही फडतूस लोक सरकारचे मालक असल्यासारखे बोलत आहेत. त्यावरुन त्यांना हे सरकार बुडवायचं आहे हे स्पष्ट होतंय. भाजपची शिवसेनेसोबत राहण्याची इच्छा नसेल तर छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरेंच्या पाठिंब्यावर सरकार चालावा असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.   काल माधव भंडारी यांनी मनोगत या भाजपच्या पाक्षिकातून उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंची तुलना शोलेमधील असरानीबरोबर केली. त्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली आहे.   काय म्हणाले संजय राऊत ? भाजपमधील काही फडतूस लोक सरकारचे मालक असल्यासारखे सध्या बोलत आहेत. ही त्यांच्या अकलेची दिवाळखोरी आहे. हे सरकार त्यांना बुडवायचे आहे आणि त्यासाठीच त्यांना ही अवदसा आठवली आहे.   राज्यातील भाजप सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर आहे, हे त्यांनी विसरु नये. जर त्यांची इच्छा नसेल तर छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे यांच्या पाठिंब्यावर त्यांनी हे सरकार खुशाल चालवावे.   अशाप्रकारचा गोंधळ आणि अराजक निजामाच्या काळातच होता. भाजपातील फडतूस लोक ती स्थिती निर्माण करणार असतील तर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांना चाप लावावा. शिवसेना आणि शिवसैनिक हा प्रकार सहन करु शकणार नाहीत.   शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी भाषा वापरली जात आहे, ती वैयक्तिक मते असू शकत नाहीत.   अशा प्रकारची मतं मांडून जर कोणी शिवसेना आणि शिवसेना कार्यध्यक्षांची बदनामी करत असेल, तर त्यांचा बंदोबस्त करायला शिवसैनिक समर्थ आहेत. हे कोणाचे वैयक्तिक मत नसून ही शिवसेनेची भूमिका आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.   सेना खासदार खैरेंचं टीकास्त्र भाजप प्रवक्ते माधव भंडारींची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबाबत बोलायची औकात नाही. त्यांनी यापुढे उध्दव ठाकरेंविरोधात बोलू नये. शिवसैनिक हा माथेफिरु असतो आणि तो काहीही करु शकतो. अशा शब्दात शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी माधव भंडारींना आणि भाजपला धमकी वजा इशारा दिला आहे. किशोरी पेडणेकरांचा घणाघात मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनीही भाजपवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंना जर असरानी म्हणत असाल, तर भाजप अध्यक्ष अमित शाह हे गब्बर सिंह आहेत. ज्या पद्धतीने अमित शाह कारभार करतायत ते पाहता ‘शोले’मध्ये शेवटी जी हालत गब्बरची झाली, तीच हालत भाजपच्या या गब्बर सिंघची व्हायला वेळ लागणार नाही, असा हल्लाबोल शिवसेनेच्या मुंबईच्या मनपातील नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.   माधव भंडारी 'मनोगत'मध्ये काय म्हणाले? मनोगत या भाजपच्या पाक्षिकातून उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांवर टीकेची झोड उठवली. ‘राऊत साहेब तलाक केव्हा घेताय’, असं शिर्षक देऊन भाजप सरकारचा निजामांचा बाप असा उल्लेख करणाऱ्या राऊतांवर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींनी टीका केली. ..अन्यथा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालवा : शिवसेना तसंच या पाक्षिकात उद्धव ठाकरेंची तुलना ‘शोले’ सिनेमातल्या जेलरच्या भूमिका साकारणाऱ्या ‘असरानी’ यांच्याशी करून खिल्ली उडवली आहे. संबंधित बातम्या 'भंडारी औकातीत राहा, आम्ही कधी सोमय्यांना शक्ती कपूर म्हटलंय का?' अमित शाह गब्बर, माधव भंडारी राजपाल यादव, सेनेचा हल्लाबोल 'सत्य हे शेवटी सत्यच असते', सामनातून सेनेचा भाजपवर निशाणा 'राऊत साहेब, तलाक केव्हा घेताय?' भाजपाच्या पाक्षिकातून सेनेवर शरसंधान

महत्त्वाच्या बातम्या

NCP Ajit Pawar Camp: पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली; उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली, उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
UP MLC Election Result 2026: वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
NCP Ajit Pawar Camp: पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली; उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली, उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
Gokul Election: गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Raj Thackeray: 'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
Embed widget