एक्स्प्लोर
‘चलो अयोध्या, चलो वाराणसी', सेनेचे पोस्टर्स, उद्धव ठाकरेंचा दौरा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या आणि वाराणसीचा दौरा आखला आहे.

मुंबई: हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या आणि वाराणसीचा दौरा आखला आहे.
शिवसेनेने मुंबईत विविध ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याचे पोस्टर्स लावले आहेत. ‘चलो आयोध्या, चलो वाराणसी, देशाच्या राजकारणातील महत्त्वकांक्षी पाऊल’ असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं आहे. या पोस्टर्सवर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचाही फोटो झळकत आहे.
अयोध्या आणि वाराणसी दौऱ्यात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन या पोस्टर्समधून करण्यात आलं आहे. 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला कोंडित पकडण्यासाठी शिवसेनेनं मोठं पाऊल टाकल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, शिवसेनेचे हे पोस्टर्स मुंबईभर लावण्यात आले आहेत. वांद्रे परिसरात तर पावला पावलावर हे पोस्टर्स झळकत आहेत.
दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या वाढदिवस आहे. त्याबाबतचेही पोस्टर्स या पोस्टर्सच्या बाजूला दिसत आहेत.
उद्धव ठाकरेंच्या अयोध्या आणि वाराणसी दौऱ्यात शिवसैनिकांनो सामील व्हा, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांची मुंबईत पोस्टरबाजी हिंदुत्वाचा मुद्द्यावर शिवसेना पुन्हा आक्रमक @abpmajhatv pic.twitter.com/wU6cPwb4Hk
— Vaibhav Suresh Parab (@vaibhavparab21) July 26, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
नाशिक
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
