एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोनावरून राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांना क्वारेन्टाइन करा : संजय राऊत

कोरोना व्हायरसमळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीत महाराष्ट्राला पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची गरज असल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. कोरोनावरून राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांना क्वारेन्टाइन करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय.

मुंबई : कोरोनावरून राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांना प्रबोधिनी म्हाळगीमध्ये क्वारेन्टाइन करा, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. अशा संकटाच्या काळात सरकारच्या खांद्याला खांदा लावून विरोधी पक्षाने लढण्याची गरज असते. एवढा शहाणपणा विरोधी पक्षाकडे नसेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात काम करण्याचा त्यांना अधिकार नाही, असा घणाघातही राऊत यांनी विरोधी पक्षावर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन कोरोनाशी युद्ध लढत आहे. हे देशात कधीही घडताना दिसले नाही. मात्र, ज्यांना याचं राजकारण करायचं आहे, अशा भाजप नेत्यांसाठी पंतप्रधान मोदींनी शिबीर घेऊन शिकवण्याची गरज असल्याची टीका राऊत यांनी केली. आज राज्यात एकसंध राहून आणि राजकीय मतभेद विसरुन काम करण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थिती सर्वांनी एकत्र येण्याची गरज राऊत यांनी व्यक्त केली. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. आम्ही म्हणतो देशाला मोदींचीच गरज आहे. मात्र, ज्यांना याचं राजकारण करायचं आहे, अशा भाजप नेत्यांसाठी पंतप्रधान मोदी यांनी शिबिर घेऊन अशा संकट काळात सरकारसोहत राहून काम कसे करावे, हे शिकवण्याची गरज असल्याची टीका राऊत यांनी केलीय. कोरोनाच्या संकटात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सुसंवाद आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. केंद्र सरकार सहकार्य करत नाही, असं आम्ही कधीच म्हणलो नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केलं. Coronavirus | पहिली ते आठवीची परीक्षा रद्द; नववी, अकरावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि आमदारांना प्रलोभन माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि आमदारांना प्रलोभनं दाखवली जात आहेत. ते या देशाला शोभणारं नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या व्यक्तींनी अशा लाभांच्या पदांपासून दूर राहावे. यामुळे न्यायपालिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही राऊत म्हणाले. दरम्यान, लोकांमध्ये जनजागृती आहे. मात्र, जे स्वतःला पुढारी समजतात ते या गोष्टी पाळताना दिसत नसल्याचे राऊत म्हणाले. मात्र, पुढील काळात सर्वांनी राष्ट्रहितासाठी घरात राहणे गरजेचे आहे. फक्त भारत माता की जय म्हणजे राष्ट्रभक्ती नाही. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत सर्वांनी एकत्र येत सरकारच्या सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे. हीच प्रखर राष्ट्रभक्ती असल्याचे राऊत यांनी सांगितले. Coronavirus | कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी लोक आयुर्वेदाकडे; भिमसेनी कापूर, तुरटी अन् निलगिरी तेलाला मागणी मी घरी राहणार, कोरोनाला हरवणार आणि जिंकणार : संजय राऊत मी स्वतः कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी काळजी घेत आहे. यासाठी मी सामनाच्या ऑफिसमध्येच असतो. येथे लोकांच्या भेटीगाठी कमी केल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच आम्ही कमीतकमी लोकांमध्ये काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पुढील 15 दिवस तुम्हीही तुमच्या घरात राहण्याचं आवाहन राऊत यांनी केलं. Health Minister on #Corona | गर्दीच होणार असेल तर मुंबईची लाईफलाईन बंद करावी लागेल - राजेश टोपे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
Anna hazare : आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
Champions Trophy :चॅम्पियन्स ट्रॉफीतील धोकादायक संघ कोणता? भारत, पाकिस्तान की.... रवी शास्त्रींनी कोणत्या संघाचं नाव घेतलं?
चॅम्पियन्स ट्रॉफीतील धोकादायक संघ कोणता? भारत, पाकिस्तान की.... रवी शास्त्रींनी कोणत्या संघाचं नाव घेतलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूसSuresh Dhas PC : जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याच कळतं का? धस यांचा हल्लाबोलGiriraj Sawant On Rushiraj Sawant : भावाचा बाहेर जातोय असा मेसेज,ऋषिराज सावंतांचे मोठे बंधू 'माझा'वरCotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली
Anna hazare : आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
आधी अरविंद केजरीवालांना सुनावलं, आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही, म्हणाले...
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
बाबा रामदेव यांच्या कंपनीने मोडले सर्व विक्रम, नफ्यात झाली मोठी वाढ, तेलाच्या विक्रीतून सर्वाधिक कमाई 
Champions Trophy :चॅम्पियन्स ट्रॉफीतील धोकादायक संघ कोणता? भारत, पाकिस्तान की.... रवी शास्त्रींनी कोणत्या संघाचं नाव घेतलं?
चॅम्पियन्स ट्रॉफीतील धोकादायक संघ कोणता? भारत, पाकिस्तान की.... रवी शास्त्रींनी कोणत्या संघाचं नाव घेतलं?
मुंबईतील वयोवृद्ध महिलेची निर्घुण हत्या, शेजारील 27 वर्षीय युवकाला अटक; पोलिसांनी 2 तासांत लावला छडा
मुंबईतील वयोवृद्ध महिलेची निर्घुण हत्या, शेजारील 27 वर्षीय युवकाला अटक; पोलिसांनी 2 तासांत लावला छडा
पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला राज्याच्या पंचायत विभागाकडून खो; कोट्यवधींची रक्कम थकीत
पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला राज्याच्या पंचायत विभागाकडून खो; कोट्यवधींची रक्कम थकीत
Chhagan Bhujbal : अहो भुजबळ! तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलेय; भाजपचा बोचरा पलटवार
अहो भुजबळ! तुमच्याच पक्षाने तुम्हाला हिमालयात पाठवायची व्यवस्था केलेय; भाजपचा बोचरा पलटवार
राहुल सोलापूरकर पुरावे द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षाचा सज्जड इशारा 
राहुल सोलापूरकर पुरावे द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षाचा सज्जड इशारा 
Embed widget