एक्स्प्लोर
Coronavirus | कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी लोक आयुर्वेदाकडे; भीमसेन कापूर, तुरटी अन् निलगिरी तेलाला मागणी
मास्क आणि सॅनिटायझर बाजारातून गायब झाल्याने आता भीमसेन कापूर, तुरटी आणि निलगिरी तेल खरेदीसाठी लोक गर्दी करू लागलेत. या गोष्टींचा नक्कीच काही प्रमाणात फायदा होऊ शकतो, असे आयुर्वेदातील तज्ज्ञ सांगत आहेत.

मुंबई : कोरोनाच्या दहशतीमुळे बाजारातील सर्व प्रकारचे मास्क आणि सॅनिटायझर गायब झाले आहे. त्यामुळे नागरिक आता स्वतःच्या सुरक्षेसाठी आयुर्वेदात सांगितलेले भीमसेन कापूर, तुरटी आणि निलगिरी तेल याच्या खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत. सध्याच्या स्थितीत भीमसेनी कापूर, तुरटी हे जंतुनाशक असून याच्या वापराचा नक्कीच काही प्रमाणात फायदा होईल, असे आयुर्वेदाचार्यांकडून सांगण्यात येत आहे. यावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वापराचे प्रयोग झाले नसले तरी यामुळे तोटा होत नसल्याचे मत डॉक्टर व्यक्त करीत आहेत. त्यामुळे दुकानात या गोष्टी घेण्यासाठी गर्दी वाढत आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या स्वाईन फ्ल्यू या साथीत भीमसेन कापूरचा फायदा झाल्याचा अनेकांचा अनुभव असल्याने याचा वापर करण्यास हरकत नसल्याचे डॉक्टरांचे मत आहे. मेडिकल क्षेत्रात अजूनही कोरोनाला लस मिळत नसताना हे आपल्या पूर्वजांचे उपाय करायला हरकत नसल्याचा दावा आयुर्वेदाचार्य करीत आहेत. कोरोना व्हायरसमुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळे औषध शोधत आहेत. Coronavirus | वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी महिनाभर मोफत इंटरनेट कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज शरीरातील रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात जे उपाय दिले आहेत. त्याचा वापर केल्यास शरीरातील इम्युनिटी पॉवर वाढून अशा व्हायरसविरोधात लढण्यास शक्ती मिळत असते. वास्तविक सर्वच दुकानात साबण व हॅन्ड वॉश मिळत असताना सॅनिटायझरसाठी नागरिक फिरत होते. आता जंतू दूर ठेवणारे भीमसेन कापूर, तुरटी आणि निलगिरी तेलाची खरेदी करू लागले आहेत. झाडांपासून मिळणाऱ्या भीमसेन कापूरला आयुर्वेदात खूप महत्व आहे. हा सोबत ठेवल्यास कोणतेही जंतू जवळ येत नसल्याचा नागरिकांना विश्वास वाटतो. याशिवाय जंतुनाशक म्हणून ओळख असलेली देशी तुरटी आंघोळीच्या आणि वापरायच्या पाण्यात घातल्यामुळे यात कोणतेही जंतू जिवंत राहत नसल्याचेही सांगितले जाते. मास्कऐवजी चार पदरी रुमाल करून त्यावर निलगिरी तेलाचे दोन थेम्ब टाकण्यासाठी निलगिरीच्या बाटल्याही नागरिक घेऊ लागले आहेत. अर्थात कोरोना विषाणूवर भिमसेन कापूर, तुरटी किंवा निलगिरी तेलाचा काय परिणाम होतो याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी पूर्वीच्या काळापासून चालत आलेले हे घरगुती उपाय योजून नागरिक खबरदारी घेत आहेत. Kanika Kapoor diagnosed with Corona | बेबी डॉल फेम गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण, लंडनहून परतल्यानंतर नेत्यांसह जंगी पार्टी!
आणखी वाचा























