Sanjay Raut : शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, सरकार उलथवण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल, राऊतांचा हल्लाबोल
आजचा मोर्चा म्हणजे हे सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल असल्याचे वक्तव्य शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं.
Sanjay Raut : महापुरुषांचा अपमान करुन कोणी सत्तेत बसू शकेल का? या सरकारला सत्तेवर बसण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे वक्तव्य शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. आजचा मोर्चा म्हणजे हे सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल आहे. शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही असा इशाराही राऊतांनी दिली. आज दिल्लीसुद्धा दुर्बीणीतून बघत असेल की, महाराष्ट्राची ताकद काय आहे. आज महाराष्ट्र (Maharashtra) जागा झालाय. महाराष्ट्र पेटून उठल्याचे राऊत म्हणाले.
जनता संधीची वाट बघतेय
आजच्या मोर्चात प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी सामील झाला असल्याचे संजय राऊत म्हणाले. आपल्या महापुरुषांचा अपमान सहन करणारे मंत्रालयात बसले आहेत. हा सगळ्यात मोठा अपमान असल्याचे म्हणत राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली. महाराष्ट्राची साडेअकरा कोटी जनता हे सरकार उलथून टाकण्याच्या संधीची वाट पाहत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. आजचा मोर्चा म्हणजे हे सरकार उलथून टाकण्यासाठी टाकलेलं हे पहिलं पाऊल असल्याचे राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात, गावागावात या सरकारच्या विरोधात रोष आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राचा रंग एक झाला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी आमच्या ताब्यात द्या
व्यासपीठावर सर्व पक्षाचे नेते उपस्थित आहेत. आमची रणणिती ठरली असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. युद्धासाठी ही फौज तयार झाली असल्याचे राऊत म्हणाले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जमत नसेल तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी आमच्या ताब्यात द्या. ते रोज महाराष्ट्राच्या बदनामी करत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. आपण सुरु केलेल्या लढाईमुळं सरकार हतबल झालं आहे. सरकार लटपटायला लागलं आहे. हम सब एक है हे सागंण्यासाठी आजचा मोर्चा असल्याचे राऊत म्हणाले.
सरकारला एक मिनीटसुद्धा सत्तेत बसण्याचा अधिकार नाही
आमच्या महापुरुषांचा अपमान करुन कोणी सत्तेत बसू शकेल का? असा सवालही राऊतांनी यावेळी केला. एक मिनीटसुद्धा सत्तेत बसण्याचा अधिकार नाही असे ते म्हणाले. महाराष्ट्राची ताकद आज दिल्लीसुद्धा बघत असेल असेही राऊत म्हणाले. आज प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी पेटून उठला आहे. सरकार उलथून टाकण्यासाठी महाराष्ट्रातील जनता संधीची वाट वाट पाहत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. रावण गाडण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: