एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शीना बोरा हत्याकांड प्रकरणी इंद्राणीच्या जामिनास सीबीआयचा विरोध कायम
पीटरला मिळालेल्या जामिनाच्या आधारावर इंद्राणीला जामीन देता येणार नाही. तसेच पीटर मुखर्जीच्या जामीनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असल्यानं पीटरही अद्याप तुरूंगातच असल्याची माहिती सीबीआयच्यावतीने कोर्टाला देण्यात आली.
मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणाती सुरू असलेल्या खटल्याच्या या टप्यावर साक्षीदारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करून मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर करणे म्हणजे संपूर्ण खटल्याचा पायाच डळमळीत करण्यासारखे आहे. असा दावा करत सीबीआयने गुरुवारी पुन्हा एकदा इंद्राणी मुखर्जीच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.
इंद्राणी हीच शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. तिचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने वारंवार नाकारल्यानंतरही इंद्राणीने पाचव्यांदा आपला जामीन अर्ज दाखल केला आहे. आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात विसंगतपणा असून साक्षीदारांच्या साक्षीतही विश्वासाहर्ता नाही. तसेच या खटल्यातील अन्य एका आरोपीला म्हणजेच इंद्राणीचा तात्कालीन पती पीटर मुखर्जीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन देण्यास आल्यामुळे आपल्यालाही जामीन देण्यात यावा असा दावा इंद्राणीने या याचिकेतून केला आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांच्यासमोर यावर गुरूवारी सुनावणी पार पडली. आरोपीला जामीन देताना न्यायालयाने ठोस कराणावरच जामीन द्यावा, कारण खटल्याच्या या टप्यावर साक्षीदारांच्या विश्वसनियतेवर प्रश्नचिन्ह उभे करून प्रमुख आरोपीला जामीन मंजूर करणे म्हणजे संपूर्ण खटल्याचा पायाच डळमळीत केल्यासारखे होईल असा युक्तिवाद सीबीआयाच्यावतीने अॅड. मनोज चलदन यांनी केला. तसेच या हत्याकांडात इंद्राणी ही मुख्य आरोपी असून पीटरची भूमिका काहिशी वेगळी आहे. त्यामुळे पीटरला मिळालेल्या जामिनाच्या आधारावर इंद्राणीला जामीन देता येणार नाही. तसेच पीटर मुखर्जीच्या जामीनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असल्यानं पीटरही अद्याप तुरूंगातच असल्याची माहिती सीबीआयच्यावतीने कोर्टाला देण्यात आली.
एप्रिल 2012 मध्ये मुलगी शीना बोरा यांच्यासह इतर दोन आरोपींच्या हत्येचा आरोप आहे. ऑगस्ट 2015 मध्ये तिच्या ड्रायव्हर श्यामवर रायला एका प्रकरणात अटक केल्यानंतर त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर हे सारं प्रकरण उघडकीस आलं. ज्यात इंद्राणी आणि तिचा पूर्व पती संजीव खन्ना यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीलाही या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात तेव्हापासून हे सारे कारागृहात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
क्रीडा
Advertisement