पुतण्यावर आरोप, काकी मैदानात, आदित्य असं काही करु शकेल वाटत नाही, शर्मिला ठाकरेंकडून पाठराखण!
Sharmila Thackeray on Aaditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार असा दावा सातत्याने नितेश राणे करत आले आहेत. एकीकडे हे सर्व असताना, तिकडे राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या काकी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी आदित्य यांची पाठराखण केली आहे.
मुंबई : दिशा सालियन (Disha Salian) मृत्यूप्रकरणात राज्यातील शिंदे सरकराने (CM Eknath Shinde) विशेष तपास यंत्रणा अर्थात SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे. याप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि सर्व सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे सातत्याने बोट दाखवलं आहे. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार असा दावा सातत्याने नितेश राणे करत आले आहेत. एकीकडे हे सर्व असताना, तिकडे राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे यांच्या काकी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी आदित्य यांची पाठराखण केली आहे.
मला असं वाटत नाही आदित्य असं काही करेल, चौकशा तर कोणीही लावेल, आम्ही पण यातून गेलोय, अशा शब्दात शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वयंरोजगार विभागाकडून महिलांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील मराठी पत्रकार संघात करण्यात आलं आहे. 'उद्योग कर उद्योग' या संकल्पनेंतर्गत महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या अनेक संधी एकाच मंचावरती उपलब्ध करून देऊन महिलांना उद्योग क्षेत्रा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून शर्मिला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी आदित्य ठाकरेंसंदर्भात बोलताना दिशा सालियनप्रकरणी त्याने काही केलं असेल असं वाटत नाही. चौकश्या तर आमच्या पण लावल्या होत्या आम्ही पण यातून गेलोय असं त्या म्हणाल्या.
महिलांसाठी 'उद्योग कर उद्योग' कार्यक्रम
आपल्या देशात 60 टक्के तरुण आहेत. आपल्याकडे नोकऱ्या उपलब्ध नाही. त्यात केंद्र आणि राज्याच्या अनेक योजना आहेत, ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. नोकऱ्या नसतात, त्यात उद्योग कसा करायचा यासंदर्भात हा कार्यक्रम आहे. अनेक जण आपल्या पाल्यांना कर्ज काढून शिक्षण देतात, मात्र नोकऱ्याच नसल्याने अडचण येते, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
बेरोजगाराचा मुद्दा
राज ठाकरे यांनीदेखील हा बेरोजगाराचा मुद्दा मांडला होता. 1993 साली यासंदर्भात मोर्चादेखील काढला होता.त्यामुळे त्या वेळेपासून हा प्रश्न निर्माण झाला आहे. मला वाटतं सरकारनं लोकसंख्या नियंत्रणात आणायला हवी. तेव्हाच हे प्रश्न सुटू शकतील. शिवाय उद्योजकही निर्माण केले पाहिजेत, असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.
मनसे हा एकमेव पक्ष आहे जिथे रोजगारासंदर्भातला विभाग आहे.आम्ही रोजगार देण्यासाठी काम करतोय.
मात्र हे आता मुंबई पुरते मर्यादित न ठेवता राज्यभर व्हायला पाहिजे, असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
दिशा सॅलियनप्रकरणावर भाष्य
मला असं वाटत नाही आदित्य असं काही करेल. चौकशा तर कोणीही लावेल, आम्ही पण यातून गेलोय, असं शर्मिला ठाकरे यांनी नमूद केलं.
सरकारकडून SIT ची घोषणा
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी (Disha Salian Case) राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी म्हणजे 12 डिसेंबरला मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत. अप्पर पोलिस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन हे एसआयटीचे नेतृत्त्व करणार आहेत.
दिशा सालियन मृत्यू
मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते.
VIDEO : शर्मिला ठाकरे नेमकं काय म्हणाल्या?