एक्स्प्लोर

Disha Salian : दिशा सालियान आत्महत्या चौकशी प्रकरणी मोठी अपडेट; या अधिकाऱ्यांकडे एसआयटी तपासाची सूत्रे

Disha Salian Case : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी अखेर विशेष चौकशी समिती (SIT) स्थापन केली आहे.

Disha Salian Death Case SIT :  दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी (Disha Salian Death Case) मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते. त्यानंतर तत्काळ कार्यवाही झाली असून मुंबई पोलीस आयुक्तांनी एसआयटी (SIT) स्थापन केली असून तपास अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले आहेत. अप्पर पोलिस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन हे एसआयटीचे नेतृत्त्व करणार आहेत. 

गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. अखेर आज मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलिस आयुक्तांनी दिशा सालियान मृत्यु प्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले आहेत.  परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त अजय बन्सल आणि मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक चिमाजी आढाव यांच्या नेतृत्वात प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. त्याशिवाय, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन हे टीमचं नेतृत्व करणार आहेत. यामध्ये क्राईम ब्रांच आणि इतर युनिट्सच्या तज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. 

दिशा सालियान हीने आत्महत्या केली असल्याचे मुंबई पोलिसांनी आपल्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले होते. त्यानंतर दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्याने आरोप सुरू होते. आता विशेष चौकशी स्थापन करण्यात आल्यानंतर पुन्हाने तपास होणार आहे. या आधी झालेल्या तपासात काही त्रुटी राहिल्या असतील, ती बाब लक्षात घेता तपास सुरू होईल. त्याशिवाय, या प्रकरणात कोणाकडे काही पुरावे असतील तर त्यांच्याकडून ही पुरावे जमा केले जाण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आहे. 

आदित्य ठाकरेंचीही चौकशी होणार? 

ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणी येत्या काळात वाढणार असल्याचं बोललं जात आहे. राज्य सरकारनं दिशा सालियान प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुंबई पोलिसांना आदेश दिले आहेत. तसेच, याप्रकरणी आदित्य ठाकरेंचीही चौकशी केली जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्याचं पाहायला मिळत आहे. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्यानं काही आमदार करत होते. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी  SIT चौकशीचे आदेश दिले होते. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या SIT चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण? 

मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू  8 जून 2020 रोजी झाला. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.  शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. दिशाच्या आत्महत्येच्या काही दिवसंनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेदेखील आत्महत्या केली होती. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Embed widget