Lockdown Again | राज्यात पुन्हा टाळेबंदीवर शरद पवार यांची नाराजी
राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पवार यांनी काल (3 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
मुंबई : राज्यामध्ये विविध शहरात अचानक टाळेबंदी घोषित होण्याच्या पद्धतीमुळे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांत बेबनाव आहे. त्यानंतरही ज्या पद्धतीनं राज्यामध्ये टाळेबंदी लावली जात आहे, त्यावरून शरद पवारही नाराज असल्याचे वृत्त आहे. या संदर्भात शरद पवारांची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. चर्चेत इथून पुढे जिल्हाधिकाऱ्यांनी लोक प्रतिनिधींना न विचारता टाळेबंदी घोषित करू नयेत अशा शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सूचना केल्याचं कळतंय.
कधी औरंगाबाद, कधी मुंबई, कधी ठाणे, कधी अक्कलकोट, कधी बीड तर कधी आणखी कोणत्या तरी शहरात अचानक टाळेबंदी घोषित झाल्याच्या बातम्या गेल्या चार दिवसांत येत आहेत.
स्थानिक पातळीवरची टाळेबंदी घोषित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. जिल्हाधिकारी महसूल यंत्रणेचे प्रमुख. ही महसूल यंत्रणा इतर विभागाच्या समन्वयासाठी कधीच प्रसिद्ध नव्हती. सुरुवातीपासून टाळेबंदी जाहीर करत असताना मनमानीच्या गोष्टी घडल्या. राज्यात अनेक ठिकाणी टाळेबंदी लावताना समन्वय समितीच्या बैठकाच घेतल्या गेल्या नाहीत. मुंबईत दोन किलोमीटरच्या क्षेत्रातच नागरिकांनी वावर ठेवावा, असं मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी पत्रक काढले. ज्याची गृहमंत्र्यांनाच माहिती नव्हती.
Pawar, Thackeray | पवार-ठाकरे बैठकीत काय घडलं?
राज्यातल्या महत्त्वाच्या 22 ठिकाणी पूर्णपणे किंवा अंशता टाळेबंदी राज्यात अनलॉक दोनची प्रक्रिया सुरू आहे. राज्याचा आर्थिक गतीचा गाडा पुन्हा सुरळीत करावा असे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, अनलॉकच्या प्रोसेसमध्ये रुग्णांची संख्या वाढते हेही खरंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबतच्या काही बैठकांमध्ये अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा टाळेबंदी लागू करावी, असं सुचवलं होतं. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यावयाचा सूचना दिल्या. झालं त्यानंतर एका पाठोपाठ एक राज्यातल्या महत्त्वाच्या 22 ठिकाणी पूर्णपणे किंवा अंशता टाळेबंदी लागू झाली आहे.
या टाळेबंदीची शरद पवार यांनाही कल्पना नाही राज्यात पुन्हा एकदा सुरू झालेल्या टाळेबंदीची शरद पवार यांनाही कल्पना नाही. आघाडी सरकार मधल्या काही मित्रपक्षांनी पुन्हा सुरू झालेल्या टाळेबंदीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. काही मंत्र्यांनी राज्यात प्रशासकीय अधिकारीच राज्य चालवतात अशा जाहीर प्रतिक्रिया दिल्यात. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची काल (3 जुलै) बैठक झाली. या बैठकीत पवारांनी टाळेबंदी वर नाराजी व्यक्त केली अशा बातम्या आहेत.
Ashish Shelar | तीन पक्षांचं सरकार...खाटांची रोज कुरकुर; आशिष शेलार यांची ठाकरे-पवार भेटीवर टीका