एक्स्प्लोर
भाजपकडून महापौरपदासाठी शैलजा गिरकर यांचं नाव आघाडीवर
मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेनेकडून कोण उमेदवारी अर्ज भरणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. मात्र, त्याआधी महापौरपदासाठी बऱ्याच नावांची चर्चा सुरु आहे. सध्या भाजपकडून शैलजा गिरकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. गिरकर या चारकोप वॉर्ड क्रमांक 21 मधील नगरसेविका आहेत. गेल्या 25 वर्षापासून त्या नगरसेविका असून त्यांनी याआधी उपमहापौरपदही भूषवलं आहे. त्यामुळे यंदा महापौर पदासाठी सध्या त्यांचं नाव आघाडीवर आहे.
भाजप आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी 2 वाजता अर्ज भरणार आहेत. त्याआधी दुपारी 1 वाजता भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक भाजप प्रदेश कार्यालयात जमणार आहेत. त्यानंतर मुंबई महापालिकेत अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
दुसरीकडे शिवसेनेनंही महापौरपदासाठी जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेत अनेक जणांच्या नावाची चर्चा असली तरी सध्या विशाखा राऊत यांचं नवा आघाडीवर आहे. विशाखा राऊत यांनी याआधीही महापौरपद भूषवलं होतं.
यावेळी मुंबई महापालिकेचं महापौर पद खुलं आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही जास्त आहे. पण जर दोन्ही पक्षांनी महिलांना संधी दिली तर, पुन्हा एकदा मुंबईत महिला महापौर होऊ शकतील.
संबंधित बातम्या:
शिवसेनेची ‘मातोश्री’वर तातडीची बैठक, सेनेचे महत्वाचे नेते हजर
महापौर निवडणुकीत मनसे, MIM भाजपला पाठिंबा देणार?
शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची ‘वर्षा’वर खलबतं
शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची ‘वर्षा’वर खलबतं
मुंबई महापौरपदाबाबत अखेर मनसेने मौन सोडलं !
कॅबिनेट बैठकीत विरोधी पक्षनेते, पत्रकारांना स्थान द्या : शिवसेना
..म्हणून गीता गवळी यांनी शिवसेनेची साथ सोडली ?
महापौरपदासाठी काँग्रेसचाही उमेदवार, राष्ट्रवादी म्हणते..
उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं नाही : गीता गवळी
मुंबईच्या महापौरपदासाठी गीता गवळींचा भाजपला पाठिंबा
विमानतळावर उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील आमनेसामने, मात्र…
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
Advertisement