एक्स्प्लोर
Advertisement
स्कूल बसमध्येच गळफास घेऊन ड्रायव्हरची आत्महत्या
मुंबई: मुंबईतील मालाडमध्ये एका खाजगी स्कूल बसच्या ड्रायव्हरनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सूरज बन्सीलाल पाठक असं या ड्रायव्हरचं नाव आहे. सूरज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेच्या बसमध्ये कॉन्ट्रॅक्टवर ड्रायव्हिंग करत होते.
जी बस तो रोज चालवायचा त्याच बसमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, सूरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बोरिवलीमधील एका जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
शाळेच्या गेटजवळ उभ्या असलेल्या बसमध्येच सूरजनं फाशी घेऊन आत्महत्या केली. रात्री 9-10च्या दरम्यान या परिसरात राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement