एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sanjay Raut Press Conferance : संजय राऊत 'व्हिडीओ बॉम्ब' फोडणार! विरोधी पक्षातले कोणते 'साडेतीन' नेते जखमी होणार?

Sanjay Raut Press Conferance : शिवसेना भवनात होणाऱ्या पत्रकार परिषदेत 'मनसे' पॅटर्न' राबवला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. पत्रकार परिषदेत संजय राऊत व्हिडीओ बॉम्ब फोडणार असल्याची माहिती ABP Majha च्या हाती लागली आहे.

Sanjay Raut Press Conferance : शिवसेनेच्या पत्रकार परिषदेसंदर्भातील एक मोठी बातमी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत लाव रे तो व्हिडीओ पॅटर्न पाहायला मिळणार आहे. व्हिडीओच्या माध्यमातून शिवसेना कुणाची पोलखोल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत आज कोणता गौप्यस्फोट होणार? संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून फोडल्या जाणाऱ्या राजकीय बॉम्बनं विरोधी पक्षातले कोणते नेते घायाळ होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आणि त्याच पत्रकार परिषदेसंदर्भातील एक मोठी बातमी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. शिवसेना भवनातील तयारी पाहता आजच्या पत्रकार परिषदेत लाव रे तो व्हिडीओ पॅटर्न पाहायला मिळणार आहे. शिवसेना पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवून मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं समजतंय. आता व्हिडीओच्या माध्यमातून शिवसेना कुणाची पोलखोल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  दरम्यान झुकेंगे नही असा मजकूर असलेले टी-शर्ट देखील शिवसेनेनं कार्यकर्त्यांना वाटले आहेत. 

आज पत्रकार परिषदेत काय होणार?

आज सायंकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेआधीच संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केले आहे. आज होणाऱ्या शिवसेनेच्या पत्रकार परिषदेच्या आधी 'सौ सुनार की एक लोहार की' असे राऊत यांनी म्हणत सूचक वक्तव्य केले. आज संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत अनेक गोष्टी बाहेर काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊत आज सकाळीच शिवसेना भवनात दाखल झाले. शिवसेनेकडून या पत्रकार परिषदेसाठी खासदार, आमदारही उपस्थित राहणार आहेत.

काय म्हणाले होते संजय राऊत?

आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील.  मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 
 
राऊतांनी म्हटलं की, भाजपचे साडे तीन लोकं हे त्याच (अनिल देशमुखांच्या) कोठडीत असतील. महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : पंतप्रधान मोदींची विधिमंडळाचे नेते म्हणून निवड नाही, काँग्रेचा भाजपवर थेट आरोपZero Hour  : एकनाथ शिंदे दरे गावात, सत्तेवरुन महायुतीत नाराजी नाट्य? शपथविधी लांबलाZero Hour : सत्तानाट्यात अचानक सातारा जिल्ह्याची एण्ट्री, शपथविधी 5 डिसेंबरला?Rahul Shewale On Amit Shah Meeting |एकनाथ शिंदेंचा आदर राखून पुढचे निर्णय घेतले जातील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget