ED raids in Mumbai : मुंबईत ईडीचे छापासत्र, शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले...
Sanjay Raut : केंद्रीय तपास यंत्रणांनी मुंबईत आज विविध ठिकाणी छापा घातला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
![ED raids in Mumbai : मुंबईत ईडीचे छापासत्र, शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले... shiv sena leader sanjay raut reaction on ed raids in mumbai in case of dawood ibrahim and politician links ED raids in Mumbai : मुंबईत ईडीचे छापासत्र, शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/e5b86f0d8771c5a3a67677ab6b778214_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Raut on ED Raids in Mumbai : मुंबईत आज सकाळपासून ईडीने विविध ठिकाणी छापा टाकले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात काही नेत्यांनी केलेल्या कराराशी निगडीत हे छापासत्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छापे मुंबईच्या सी-वॉर्डमध्ये टाकण्यात आले आहेत. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकरचा ताबा घेऊन ईडी आणखी चौकशी करणार असल्याची शक्यता आहे. ईडीच्या छाप्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्राच्या सुरक्षेचा मुद्दा असल्यास सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाने एनआयए आणि ईडीने छापे टाकले असल्याचे म्हटले जात आहे. ईडीकडून दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि बहीण हसिना पारकर यांच्या घरीही छापे टाकण्यात आले असल्याची माहिती आहे. काही राजकीय नेत्यांनी दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्ता खरेदी केली. त्या व्यवहारावरून हे छापासत्र सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, राष्ट्राच्या सुरक्षेशी गंभीर विषय असतील तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणे आवश्यक आहे. या प्रकरणात नेत्यांची नावे येतील की घुसवली जातील हे मात्र सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
आज पत्रकार परिषदेत काय होणार?
आज सायंकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेआधीच संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केले आहे. आज होणाऱ्या शिवसेनेच्या पत्रकार परिषदेच्या आधी 'सौ सुनार की एक लोहार की' असे राऊत यांनी म्हणत सूचक वक्तव्य केले. आज संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत अनेक गोष्टी बाहेर काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊत आज सकाळीच शिवसेना भवनात दाखल झाले. शिवसेनेकडून या पत्रकार परिषदेसाठी खासदार, आमदारही उपस्थित राहणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- शिवसेना कोणता 'बॉम्ब' फोडणार? आज पत्रकार परिषद; भाजप नेत्यांना कोठडीचा रस्ता दाखवण्याचा राऊतांचा इशारा
- Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुका शिवसेना आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात लढणार, संजय राऊतांचं वक्तव्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)