(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena Press Conference : शिवसेनेची आज पत्रकार परिषद; पोलीस बंदोबस्तात वाढ, मुंबईकरांना केले 'हे' आवाहन
Shivsena Press Confernce : खासदार संजय राऊत आज सायंकाळी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
Shivsena Press Confernce : शिवसेना आणि भाजप यांच्यातील संभाव्य राजकीय संघर्षाचा पुढील अंक आज रंगण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेच्यावतीने आज दादर येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून मुंबईकरांना आवाहन करण्यात आले आहे.
आज सायंकाळी ४ वाजता शिवसेना भवनात होत असलेल्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोलिस बंदोबस्त वाढवायला सुरुवात झाली आहे. पोलिस अधिकारी, ट्रॅफिक पोलिस अधिकारी दाखल होत तयारीचा आढावा घेत आहे. शिवसेना भवन परिसरातील सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली असून सर्वेलन्स व्हॅन देखील सेना भवन परिसरात बघायला मिळत आहे. दुपारपासून शिवसेनेचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी आज शिवसेना भवनात दाखल होणार आहेत.
पोलिसांचे मुंबईकरांना आवाहन
मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. राम गणेश गडकरी चौक, दादर येथे राजकीय कार्यक्रम असल्याने कोतवाल उद्यान ते गडकरी जंक्शन ते राजाबढे चौक दोन्ही मार्गांवर दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक संथ गतीने चालू राहू शकते. त्यामुळे या वेळेत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
मुंबईतील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की गडकरी चौक, दादर, मुंबई येथे राजकीय कार्यक्रम असल्याने कोतवाल गार्डन ते गडकरी जंक्शन ते राजबढे चौक दोन्ही वाहिनीवर दुपारी 14.00 ते 18.00 वा पर्यंत वाहतुक संथ गतीने चालू राहू शकते. कृपया आपण नमूद वेळी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
— Mumbai Police (@MumbaiPolice) February 15, 2022
शिवसैनिकांची गर्दी होण्याची शक्यता
आज सायंकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेच्यावेळी शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. नाशिक येथून काही शिवसैनिक मुंबईच्या दिशेने आले आहेत. त्याशिवाय वरळी, दादर, माहिमसह मुंबईतील इतर भागांमधूनही शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- ED raids in Mumbai : मुंबईत ईडीचे छापासत्र, शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले...
- शिवसेना कोणता 'बॉम्ब' फोडणार? आज पत्रकार परिषद; भाजप नेत्यांना कोठडीचा रस्ता दाखवण्याचा राऊतांचा इशारा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha