Sanjay Raut LIVE : संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी
Sanjay Raut Arrest : शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना ईडीनं (ED) अटक केली आहे. यासंदर्भात प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर पाहा...
LIVE
Background
Sanjay Raut Arrest : शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर रात्री ईडीनं (ED) अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात ईडीनं ही कारवाई केली आहे. आज सकाळी वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना ईडीच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. काल सकाळीच ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी दाखल झालं होतं. या पथकाने दिवसभर घरामध्ये राऊतांची चौकशी आणि छापेमारी केली. त्यानंतर सायंकाळी अधिकाऱ्यांनी राऊतांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणलं. या कार्यालयात सुमारे साडेसात तास राऊतांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री त्यांना अटक करण्यात आली.
काय सकाळी सातपासून नेमकं काय काय घडलं....
रविवारी सकाळी सात वाजता दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील संजय राऊत यांच्या फ्लॅटमध्ये ईडीचे अधिकारी दाखल झाले.
सकाळी 7.15 वाजता ईडीचे पथक संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झाले. यावेळी संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनिल राऊत घरीच होते.
सकाळी 8.20 वाजता सुनिल राऊत खिडकीत आले.
सकाळी 8.40 वाजता शिवसेनेचे कार्यकर्ते संजयर राऊतांच्या घराबाहेर जमले आणि राऊतांच्या समर्थनात घोषणाबाजी केली.
सकाळी 8.46 ते 8.50 दरम्यान राऊतांचे चार ट्विट, शिवसेना सोडणार नाही, कोणत्याही घोटाळ्याशी काडीमात्र संबंध नाही, खोटी कारवाई, खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही असे चार ट्विट संजय राऊत यांनी केले.
सकाळी नऊ वाजता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांची प्रतिक्रिया आली. राऊतांच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, राऊतांच्या आजच अटकेची शक्यता, शिरसाठ यांची प्रतिक्रीया.
सकाळी 9.30 वाजता संजय राऊतांच्या घरी डीसीपी प्रशांत कदम सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोहोचले.
सकाळी 10.28 वाजता संजय राऊतांचे वकील विक्रांत साबणे पोहोचले.
सकाळी 11.07 वाजता स्वत: संजय राऊत घराच्या खिडकीत आले आणि कार्यकर्त्यांना अभिवादन केलं.
सकाळी 11.25 वाजता आढावा बैठकीसाठी जाताना मुख्यमंत्र्यांनी राऊतांच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रीया दिली.
दुपारी एक वाजता औरंगाबादमध्ये आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. कर नाही तर डर कशाला अशी राऊतांच्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
दुपारी 1.30 वाजता राजन विचारे दहा बसेस भरून ठाण्यातील शिवसैनिकांना घेऊन मातोश्रीवर दाखल झाले.
दुपारी साडेतीन वाजता संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची ईडीकडून तयारी
दुपारी 3.50 वाजाता ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले.
दुपारी 4 .10 वाजता ईडीचं पथक संजय राऊतांना घेऊन त्यांच्या निवास्थानाबाहेर पडले.
दुपारी 4. 20 वाजता ईडीचं पथक संजय राऊतांना घेऊन ईडी कार्यालयाकडे रवाना झाले,यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली.
संजय राऊतांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेल्याची 4.30 वाजता बंधू सुनील राऊत यांची माहिती
ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेतल्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलने केली.
आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते.. जो कभी हार नहीं मानता! झुकेंगे नही!, संजय राऊतांचे पाच वाजता ट्वीट
मरेन पण, झुकणार नाही; संजय राऊत, साडे पाच वाजता संजय राऊतांचा माध्यमांसोबत संवाद
ईडीच्या छापेमारीत राऊत यांच्या घरातून साडे सहा वाजता 11.50 लाख रुपये जप्त
संध्याकाळी पावणे अकरा वाजता व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल
ईडीचे अतिरिक्त संचालक सत्यव्रत कुमार रात्री पावणे बारा वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात पोहोचले.
रात्री 11.38 मिनिटांनी संजय राऊत यांना ईडीकडून अटक
आज काय होणार
संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाली आहे. दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. संजय राऊत यांना सकाळी 9:30 वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. सकाळी 11:30 वाजता संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut : संजय राऊतांवर ईडीची कारवाई, जाणून घ्या सकाळी सातपासून रात्री 12 पर्यंत काय घडलं
Aniket Nikam on Sanjay Raut : संजय राऊतांपुढे आता कोणते पर्याय? कायदेतज्ञ काय सांगतात?
Nagpur : शिवसैनिकांकडून महामार्गावरील वाहतूक अडविण्याचे प्रयत्न
नागपूरः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईविरोधात राज्यभरात शिवसेनेकडून विरोध होत असताना नागपुरातील वाडी परिसरात महामार्गावर शिवसैनिकांकडून वाहतूक अडविण्याचे प्रयत्न करण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील शिवसैनिकांनी वाडी परिसरात एमआयडीसी टी पॉइंट वर दुपारी चारच्या सुमारास आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळाने कार्यकर्त्यांनी महामार्गावर येत वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आधीच मोठा बंदोबस्त महामार्गावर ठेवल्याने शिवसैनिक चक्का जाम करू शकले नाही. मात्र त्यामुळे हिंगणा एमआयडीसी टी पॉइंट वर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
Nagpur : ईडीच्या कारवाईविरोधात शेकडो शिवसैनिक रस्त्यावर
नागपूरः शेकडो शिवसैनिकांनी नागपूरच्या व्हैरायटी चौकावर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन करत ईडीच्या कारवाईचा निषेध केला. संजय राऊत यांच्या विरोधात सुडबुद्धीने कारवाई केली जात असून ईडी केंद्र सरकारच्या हातचा बाहूला बनल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. दरम्यान काही वेळ आंदोलन केल्यानंतर शिवसैनिक अचानक घोषणाबाजी करत रस्त्याच्या दिशेने चालून गेले आणि रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी सुमारे 25 शिवसैनिकांना ताब्यात घेतले. नागपूर शहर जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आंदोलन केले.
Sanjay Raut Arrest : संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी
Sanjay Raut : संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी तीन दिवसांची ईडीची कस्टडी देण्यात आली आहे.
खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी
Sanjay Raut Update : खासदार संजय राऊत यांना चार दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. संजय राऊत 4 ऑगस्टपर्यंत कोठडीत असतील.
Sanjay Raut Update : संजय राऊत यांची अटक ही राजकीय हेतूने प्रेरित : संजय राऊतांच्या वकिलांचा युक्तिवाद
Sanjay Raut Update : संजय राऊत यांच्या बचावात वकिलांचा युक्तिवाद सुरु
संजय राऊत यांची अटक ही राजकीय हेतूने प्रेरित आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रवीण राऊत याला अटक करुन अनेक महिने झाले. इतके दिवस कारवाई का केली नाही. कारण ही कारवाई राजकीय हेतूने करायची होती.
मुंबई पोलिसांच्या EOW शाखेने 2020 मध्ये गुन्हा दाखल करुन पत्रा चाळ प्रकरणाचा तपास सुरु होता. त्यानंतर ED ने ECIR दाखल केला आणि प्रवीण राऊत यांना अटक केली. राऊत यांना आजवर अटक झाली नाही याचा अर्थ हे संपूर्णत: राजकारण आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर ही कारवाई झाली आहे. प्रवीण राऊत हे व्यापारी आहेत आणि संजय राऊत गरीब नाहीत, याचा त्यांची स्वत:ची कंपनी आहे, ज्यातून त्यांना नफा मिळतो. जर कोठडी द्यायची असेल तर ती फार कमी कालावधीसाठी द्यावी.