एक्स्प्लोर

... तर तुम्हालाही मार खावाच लागणार : संजय निरुपम

फेरीवाल्यांनी आपल्या स्वसंरक्षणासाठी प्रतिकार केला त्यात चूक नाही. मनसेची गुंडगर्दी शहरातून हटवलीच पाहिजे. त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे, असंही संजय निरुपम म्हणाले.

मुंबई : फेरीवाले जिथे कमजोर असतील तिथे तुमची दादागिरी चालेल. मात्र जिथे फेरीवाले मजबूत असतील तर तिथे मनसेला मार खावाच लागेल, असा स्पष्ट इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला आहे. मालाड येथे मनसे कार्यकर्ते आणि फेरीवाल्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांचा बचाव केला. फेरीवाल्यांनी आपल्या स्वसंरक्षणासाठी प्रतिकार केला त्यात चूक नाही. मनसेची गुंडगर्दी शहरातून हटवलीच पाहिजे. त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे, असंही संजय निरुपम म्हणाले. काही दिवसांपूर्वी भाजपचे एक आमदार फेरीवाल्यांना मारहाण करताना आढळले. आम्ही त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मनसेचे कार्यकर्ते गेले अनेक दिवस मुंबई आणि आसपासच्या उपनगरांत मारहाण करतात आणि गुन्हा दाखल होत नाही. मनसे अध्यक्ष परवानगीशिवाय मोर्चा काढतात, तरीही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही. पण मी फेरीवाल्यांसोबत बैठक घेतली तरीही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप संजय निरुपम यांनी केला. ''हफ्तेखोरीत मनसेचाही सहभाग'' जगभरात अनेक महत्वाच्या ठिकाणी फेरीवाल्यांना पाहिलं आहे. ही फक्त मुंबईपुरती समस्या नाही. सिव्हिल सोसायटीच्या लोकांनी फेरीवाल्यांऐवजी बीएमसीला नावं ठेवावीत, त्यांनी ही समस्या वाढवली आहे. गेली अनेक वर्षे महापालिका आयुक्तांना अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येबाबत चर्चा करत आहे. त्यांना लायसन्स द्या आणि ही समस्या सोडवा, अशी मागणी करत आहे. पण मुख्यमंत्री आणि आयुक्त काहीच करत नाहीत. हे सगळं होत नाही, कारण या सगळ्या रॅकेटमध्ये हफ्तेखोरी आहे, ज्यामधे मनसेचेही नेते आहेत, असा आरोपही संजय निरुपम यांनी केला. ''मारामारीत काँग्रेसचा सहभाग नव्हता'' मालाडमध्ये 1964 पासून जे फेरीवाले तिथे भाजी मार्केट लावतात त्यांना मनसेवाले हटवायला आले. अखेर सगळ्या संघर्षाचं रूपांतर मारामारीत झालं. जिथे फेरीवाले कमजोर असतील तिथे तुमची दादागिरी चालेल. मात्र जिथे फेरीवाले मजबूत असतील तिथे मनसेला मार खावाच लागेल. भाजपच्या जुहूच्या आमदारांनीही फेरीवाल्यांना मारहाण केली. मालाडमध्ये जो प्रकार झाला, त्यात काँग्रेसच्या एकाही कार्यकर्त्याचा समावेश नव्हता, असा दावा संजय निरुपम यांनी केला. ''नितेश राणेंना टोला'' दरम्यान संजय निरुपम यांनी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनाही टोला लगावला. नितेश राणे सध्या कोणत्या पक्षात आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. असंही लहान मुलांच्या बोलण्यावर मी उगाच कशाला काय बोलावं, असा टोला त्यांनी लगावला. संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल विनापरवागी सभा घेऊन लोकांना कायदा हातात घेण्याचं आवाहन करणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी निरुपम यांच्या भडकाऊ भाषणाचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं आहे. काल संध्याकाळी मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे विभाग अध्यक्षांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं कळतं आहे. संजय निरुपमांनी हल्लेखोर फेरीवाल्यांनी चिथावल्याचा आरोप मनसेतर्फे करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आज त्याची दखल घेत संजय निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल केला. सात फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल मुंबईतल्या मालाड भागात मनसे कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी 7 फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. काल मालाडमध्ये मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांना काही फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली. काय आहे प्रकरण? मालाडमध्ये फेरीवाल्यांच्या मारहाणीत जखमी झालेले मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना उपचारासाठी कांदिवलीच्या ऑस्कर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. काल मालाडमध्ये फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांना जबर मारहाण केली होती. या संपूर्ण प्रकरणाला संजय निरुपम जबाबदार असल्याचा आरोप केला जातो आहे. काँग्रेसच्या संजय निरुपमांनी फेरीवाल्यांना चिथावणी दिल्याचा आरोप मनसेनं केला आहे. संबंधित बातम्या : जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं? मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
Embed widget