एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'सत्तेच्या दरबारात मांडवली', मनसेच्या भूमिकेवर सामनातून विखारी टीका

मुंबई: 'शहीदांच्या बलिदानाची किंमत ५ कोटी समजायची का?'  असा जहरी वार आज शिवसेनेचं मुखपत्र सामनातून करण्यात आला आहे. अर्थातच मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यावरच शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 'सत्तेच्या दरबारात मांडवली झाल्यानं महाराष्ट्रावरचं संकट टळलं.' अशी बोचरी टीकाही शिवसेनेनं केली आहे. एक नजर सामनाच्या अग्रलेखावर ये तो होना ही था! * केंद्रीय राज्यकर्त्यांनी वा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेऊन ‘पाकड्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित करू नका, लोकभावना संतप्त आहे’ असे निर्मात्यांना बजावायला हवे होते. जोपर्यंत पाकिस्तान कश्मीरात हिंसाचार घडवीत आहे, देशभरात दहशतवादी हल्ले करून रक्तपात करीत आहे तोपर्यंत पाकडे कलाकार व क्रिकेटपटूंवर हिंदुस्थानात बंदी हवी. ही लढाई शिवसेनेने सुरू केली. हा विचार देशाच्या नसानसात रुजावा यासाठी शिवसेना झगडत राहिली व राहील, पण शेवटी हा ‘मक्ता’ फक्त शिवसेनेनेच घेतलेला नाही. राष्ट्रभक्तीचा अंगार सगळ्यांच्याच मनात पेटायला हवा. पाकड्या कलाकारांच्या बाबतीत जो नवा ‘चित्रपट’ लिहिला गेला त्यावर इतकेच म्हणता येईल – ‘ये तो होना ही था! * सत्तेच्या दरबारात मांडवली झाल्यामुळे महाराष्ट्रावरील संकट टळले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्ना निकाली निघाला. कारण पाकडे कलाकार असलेला ‘ये दिल है मुश्किल’ नामक चित्रपट वाजतगाजत प्रसिद्ध होत आहे. पाकड्या कलाकारांचे चित्रपट दाखवले तर चित्रपटगृहाचे पडदे जाळण्याची भाषा मुंबईने ऐकली, पण माचिस बॉक्स रिकामाच आहे. कारण ‘काड्या’ मुख्यमंत्र्यांनी जाकीटच्या खिशात ठेवल्या. यापुढे खाज आलीच तर त्याच काडीचा उपयोग कान खाजवण्यासाठी होऊ शकेल. पाक कलाकारांना अभय मिळाले असल्याने ‘पडदे’ एकदम सुरक्षित राहतील. पडद्यामागे बरेच घडले व सर्व विरोध वर्षा बंगल्यावरील चहाच्या पेल्यात विरघळून गेला. कोण जिंकले, कोण हरले या तपशिलात आम्हाला पडायचे नाही, पण या सर्व प्रकरणात आमच्या जवानांच्या हौतात्म्याचा अपमान झाला आहे. * मुख्यमंत्र्यांनी स्वत: सांगितले की, पाकिस्तानला लोकांचा विरोध आहे व पाकडे कलाकार आपल्या चित्रपटांत असणे संतापजनक आहे, पण सध्या हा पाकड्या कलाकारांचा चित्रपट लावूनच टाका. कारण शेवटी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न  आहे ना ‘‘भौ’’! तिकडे केंद्रीय राज्यकर्ते दिल्लीत बसून पाकड्यांना दम भरत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रचारसभांत सर्जिकल स्ट्राइकवर भाषणे ठोकून मते मिळवायचा प्रयत्न करीत आहेत, पण यापैकी एकाही ‘राष्ट्रभक्त’ माय का लालने असे ठणकावून सांगितले नाही की, पाकडे कलाकार असलेले चित्रपट हिंदुस्थानात आता प्रदर्शित होणार नाहीत. तिकडे आमचे जवान उरी हल्ल्यात शहीद झाले. पठाणकोटमध्ये बलिदान झाले. सर्जिकल स्ट्राइकमध्ये सहभागी झालेल्या जवानांनी पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त करून ३०-४० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तरीही पाकिस्तानी घुसखोरांकडून व सैनिकांकडून होणारे अतिरेकी हल्ले थांबलेले नाहीत. * ‘उरी’ व ‘सर्जिकल’नंतर किमान पंचवीस वेळा हे असे हल्ले झालेले आहेत. तिकडे सैनिकांचे जीव ‘मुश्कील’मध्ये आहेत याचे कुणास काही पडले नाही, पण इकडे करण जोहर, मुकेश भट्ट आणि कंपनीचा ‘दिल’ मुश्कीलमध्ये पडताच सगळेच तळमळू लागले. अर्थात सिनेमागृहाचे पडदे जाळण्याची भाषा करणारे आता तेच ‘पडदे’ अंगावर पांघरून शांतपणे पहुडले आहेत. जवानांच्या बलिदानाचे हे राजकारण असह्य आहे. आम्हाला आश्च‘र्य वाटते ते प्रखर राष्ट्रभक्त, राष्ट्रवादी वगैरे भारतीय जनता पक्षाचे. पाकिस्तानी कलाकार व राजकीय नेत्यांच्या बाबतीत सरकारची नेमकी भूमिका काय आहे? ‘सार्क’वर हिंदुस्थानने बहिष्कार टाकला याचा अर्थ स्पष्टच आहे. पाकिस्तानशी संबंध ठेवायचे नाहीत हाच याचा अर्थ ना? दुसरे असे की, सध्या पाकिस्तानी चित्रपट आणि कलाकार याबाबत असलेला संताप लक्षात घेऊन ‘मामि’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून पाक चित्रपटांना वगळण्याचा निर्णय झालाच आहे. त्यामुळे याप्रश्नीद कायदा, सरकारची भूमिका, राजशिष्टाचार यापेक्षा ‘पब्लिक क्राय’ नामक प्रकार महत्त्वाचा आहे. त्यामुळे पाक कलाकारांच्या प्रश्नीू सरकार किंवा सत्ताधारी राजकीय पक्षाने बोटचेपी भूमिका घेण्यापेक्षा ठोस भूमिका घेणे गरजेचे होते. * प्रत्येक वेळी ‘पाक’प्रश्नी दुश्मनांचे घाव झेलायचे ते फक्त शिवसैनिकांनी, ऐन सणासुदीला तुरुंगात जायचे ते शिवसैनिकांनी आणि इतरांनी मजा मारायची, पण काही झाले तरी करण जोहरच्या ‘दिल’ला संरक्षण द्यायचे. अर्थात आम्हाला हे सर्व अपेक्षितच होते. आम्ही हे सर्व तटस्थपणे पाहत होतो व शेवटी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जे चहापान वगैरे झाले त्या ‘चहा’नंतर अनेकांचे मुखवटे गळून पडले. करण जोहरने सैनिक कल्याण निधीस ५ कोटी रुपये द्यावेत म्हणे. म्हणजे आमच्या सैनिकांच्या बलिदानाची किंमत ५ कोटी म्हणायची का? उद्या पाकडे कलाकार इस्लामाबादेतून येथे असे ‘चेक’ घेऊनच उतरतील व ‘पैसा फेको तमाशा देखो’चे नवे पर्व सुरू होईल. हा भयंकर, निर्घृण आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. ज्या चित्रपटांत पाकडे कलाकार आहेत त्या चित्रपटाच्या सुरुवातीला शहीदांना श्रद्धांजली वाहणारी अक्षरे झळकतील. म्हणजे आमच्या सैनिकांचे प्राणार्पण यासाठीच झाले होते काय? एकतर केंद्रीय राज्यकर्त्यांनी वा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेऊन ‘पाकड्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित करू नका, लोकभावना संतप्त आहे’ असे निर्मात्यांना बजावायला हवे होते. संबंधित बातम्या: सैन्याला स्वत:चा स्वाभिमान, खंडणीचा पैसा नको, उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला ..म्हणून 'ऐ दिल है मुश्किल'ला परवानगी : राज ठाकरे पाकिस्तानी कलाकारांवरची बंदी योग्यच : मुख्यमंत्री 'ऐ दिल है मुश्किल'चा तिढा सुटला, सिनेमा रिलीज होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
Embed widget