एक्स्प्लोर
Advertisement
सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न महागणार, रेडी रेकनरच्या दरात वाढ
मुंबई : राज्य सरकारकडून रेडी रेकनरच्या दरात सरासरी 5.86 टक्क्यांची वाढ केली आहे. नोटाबंदीमुळे सर्वच क्षेत्रात आलेली आर्थिक मंदी दूर करण्यासाठी रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र, आत्तापर्यंतची ही सर्वात कमी वाढ असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.
राज्य सरकारने घोषित केलेल्या रेडी रेकनरच्या दरामध्ये सर्वाधिक दरवाढ अहमदनगर महापालिकेसाठी आहे. अहमदनगरमध्ये रेडी रेकनरच्या दरांमध्ये 9.82 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर नागपूरसाठी सर्वात कमी म्हणजे 1.50 टक्के वाढ करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईत 3.95, ठाणे 3.18, पुणे 3.64, नाशिक 9.35 टक्के वाढ करण्यात आली आहे.
राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात सरासरी 5.86 टक्के वाढ केली असून, ग्रामीण भागासाठी 7.13 टक्के, तर नगरपालिका क्षेत्रासाठी 5.56 टक्के, महानगरपालिका क्षेत्रासाठी 4.47 टक्के वाढ केली आहे. तसेच ज्या ठिकाणी व्यवहारातील दरात वाढ नाही, तिथे रेडी रेकनरचे दर कायम राहणार असल्याचंही राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.
राज्य सरकारने गेल्या वर्षी 2016-17 मध्ये सरासरी 7 ते 8 टक्क्यांची वाढ केली होती. त्यामुळे सध्याची ही दरवाढ कमी असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. दरम्यान, रेडी रेकनरच्या दरवाढीमुळं सर्व सामान्यांचं घर खरेदीचं स्वप्नंही महाग होणार आहे.
रेडी रेकनर म्हणजे काय?
जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी व्यवहाराच्या नोंदणीसाठी राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्क आकारलं जातं. त्यासाठी जमीन आणि इमारतीचे विभागनिहाय वार्षिक बाजारमूल्य ठरवले जाते. त्यालाच रेडी रेकनर म्हणले जाते. यामध्ये बांधकामाचा प्रकार, स्थळ आदींसंबंधी मालमत्तेचे गुण देषावरुन रेडी-रेकनरचे दर कमी आधिक ठरवले जातात.
रेडी रेकनरचे नवे दर कसे आहेत?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement