एक्स्प्लोर
Advertisement
वायकरांचा निरुपम यांच्यावर 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
मुंबई : गृहनिर्माण राज्यमंत्री आणि शिवसेना नेते रविंद्र वायकर यांनी मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर 10 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. भ्रष्टाचाराचे आणि जमीन हडपल्याचे आरोप करणाऱ्या निरुपम यांनी जर 15 दिवसात जाहीर माफी मागितली नाही तर कारवाईला तयार राहावं असा इशाराही वायकरांनी दिलाय.
आपण शस्त्रक्रियेसाठी परदेशी गेलो असता बिनबुडाचे आरोप करुन संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं, ज्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आणि मानसिक त्रासही झाला, असं वायकरांनी म्हटलंय.
गृहनिर्माण राज्यमंत्री असलेल्या वायकरांविरोधातील पुरावे घेऊन निरुपम मुख्यमंत्र्यांनाही भेटले होते. तसंच वायकरांच्या राजीनाम्याची मागणीही केली निरुपम यांनी केली होती.
निरुपम यांचं प्रत्युत्तर :
वायकर हे भारताचे नागरिक असल्याने त्यांना कोर्टात जाण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यांनी उद्याच कोर्टात जावं. मी सर्व पुरावे आणि संबंधित कागदपत्रं कोर्टातच सादर करीन. आतापर्यंत मी दोन मुद्द्यांवरच आरोप केलेले आहेत आणि या संदर्भातील सर्व कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध आहेत, असा दावा निरुपम यांनी केला आहे. माझ्याकडे त्यांच्या अनेक अवैध बांधकाम आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणांची सर्व कागदपत्रं उपलब्ध आहेत. मी ती सर्व कागदपत्रे व पुरावे कोर्टातच सादर करीन, असे प्रत्युत्तर निरुपम यांनी रवींद्र वायकर यांना दिले आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement