एक्स्प्लोर
शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन: आठवले
मुंबई: 'शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन अडीच-अडीच वर्ष महापौर पद वाटून घ्यावं. तसेच इतर समितीची पदंही दोघांनी वाटून घ्यावी. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन.' असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.
मी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंना युतीसाठी आवाहन करणार आहे. तसेच भाजपच्या यशात आमचा मोठा वाटा आहे. असंही सांगायला आठवले विसरले नाही.
दरम्यान, यावेळी बोलताना आठवलेंनी त्यांच्या शैलीत या सर्व राजकीय परिस्थितीवर एक कविताही केली. 'भाजपने केली कमाल, आता सेनेसोबत युती करून दोघांनी करावी धम्माल.'
मुंबई महापालिकेत कुणाही एका पक्षाला सत्ता मिळाली नसल्यामुळे सत्तेचं त्रांगडं झालं आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपकडून सत्तेसाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. मुंबईत शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याबद्दल आज भाजपच्या कोअर कमेटीची बैठक होणार आहे. त्यानंतर युतीचा निर्णय घेतला जाईल.
तर आज रात्री 10 वाजता मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक होईल. या बैठकीला रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. मुंबईत शिवसेनेसोबत युती करायची की महापौरपदावर दावा कायम ठेवायचा याविषयी बैठकीत रणनिती ठरणार आहे. तर शिवसेनेच्या वतीनं उद्या दुपारी 4 वाजता शिवसेना भवनात बैठक होणार आहे.
संबंधित बातम्या:
युती होणार का? आशिष शेलार म्हणतात…
राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला?
तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87
युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement