एक्स्प्लोर
रामदास आठवलेंकडून संजय गांधी उद्यानातील बिबट्या दत्तक

A
मुंबई: वन्यजीव दिनानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानातून बिबट्या दत्तक घेतला आहे. आठवलेंनी या बिबट्याचं नाव ''भीम'' ठेवलं असून त्याच्यासाठी वर्षभरात १ लाख २० हजार रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली आहे. याआधी 2014 साली आदित्य ठाकरेंनी याच उद्यानातून वाघ दत्तक घेतला होता. याची आठवण जेव्हा आठवलेंना करुन देण्यात आली त्यावर 'आधी टायगर आणि पँथरचं भांडण व्हायचं, मात्र आता दोघं सोबत असल्यानं आम्ही पूर्ण जंगल साफ करु.’ असं आठवले गंमतीत म्हणाले. 'मी दलित पँथर संघटनेमधून आलो आहे, त्यामुळे बिबट्या दत्तक घेणं हा दलित पँथर संघटनेविषयी प्रेम व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आहे.’ असंही आठवले यावेळी म्हणाले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















