एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विद्यार्थ्यांच्या 'नीट' प्रश्नाला राजकीय रंग नको: राज ठाकरे
मुंबई : 'नीट'च्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केलेल्या चर्चेला कोणताही राजकीय रंग देऊ नये, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. "राजकारणापेक्षा 4 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न हा अधिक गंभीर आहे. माझ्यानंतर अनेकांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या कल्पनाविलासाला मी आवर घालू शकत नाही" असं म्हणतं राज ठाकरेंनी विरोधकांनाही टोला लगावला.
मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला
राज्यातील नीट परिक्षेवर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. संध्याकाळी साडेसहा वाजता ही भेट होणार आहे. यात काही सकारात्मक तोडगा काढण्याचा सरकार प्रयत्न असणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरु ठेवा - तावडे
दरम्यान नीट बाबत जी महाराष्ट्राची भूमिका आहे ती सर्व राज्यांनी स्वीकारल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय.. नीटप्रश्नाचा निकाल येत्या तीन चार दिवसांत लागेलच.. मात्र विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरु ठेवावा असं आवाहन तावडेंनी केलं आहे.
यंदाच्या वर्षासाठी सीईटी परीक्षा कायम ठेवून तसा अध्यादेश काढावा आणि पुढील वर्षापासून नीटची अंमलबजावणी करावी अशी महाराष्ट्राची भूमिका आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement