एक्स्प्लोर

राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं...; महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट

ब्रिटनच्या (Britain) महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray Facebook Post) फेसबुक पोस्ट करत अभिवादन केलं आहे.

Britain Queen Elizabeth Second Died : ब्रिटनच्या (Britain) महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray Facebook Post) फेसबुक पोस्ट करत अभिवादन केलं आहे.  वयाच्या 96 वर्षी राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके एलिझाबेथ द्वितीय विराजमान होत्या. एलिझाबेथ यांचा जन्म लंडनमध्ये 21 एप्रिल 1926 रोजी झाला होता. एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला. 

अनेक राजघराणी रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली पण...

राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की,  ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. 70वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही 70 वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची 70वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ 2 ह्यांच्यामुळे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

एलिझाबेथ द्वितीय यांनी कमालीचं कौशल्य दाखवलं

राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मार्गारेट थॅचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

आता नवीन युग सुरु होतंय? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाच असेल

शेवटी राज ठाकरेंनी म्हटलं आहे की, म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं. कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण 70 वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ 2 ह्यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ 2 ह्यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरु होतंय? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाच असेल, असं म्हणत राज ठाकरे यांनी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना अभिवादन केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

ब्रिटनची राणी एलिझाबेथ-2 यांचे निधन, वयाच्या 96 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Queen Elizabeth Death : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन, पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget